काळे कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाका नगरपालिकेची सर्वसाधारण सभा; नगरसेवकांची मागणी
By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:25+5:302015-07-15T23:12:25+5:30
१५पंड०५

काळे कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाका नगरपालिकेची सर्वसाधारण सभा; नगरसेवकांची मागणी
१ पंड०५पंढरपूर येथील नगरपालिकेच्या सभागृहात जनरल सभेत बोलताना नगरसेवक. (छाया - सचिन कांबळे)पंढरपूर : शहरातील अनेक महिन्यांपासून रखडलेली रस्ता दुरुस्तीची कामे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने सुरु केली असून, ही कामे रात्रीच्या वेळी व निकृष्ट दर्जाची होत असल्याने या कामाचे ठेकेदार एस़आऱ काळे कन्स्ट्रक्शन यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत ५७ विषय घेण्यात आले.यावेळी नगरसेवकांनी नागरिकांतून शहरात सुरु असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामाबद्दल तक्रारी येत असल्याचे सांगितले. भुयारी गटार योजना झाल्यामुळे अधिकारी नागरिकांना रस्त्यालगतच्या गटारी बुजविण्याचे आवाहन करत आहेत. यामुळे पावसाचे पाणी निचरा होण्यास अडचण निर्माण आहे. यामुळे अधिकार्यांनी नागरिकांची दिशाभूल करु नये असे सांगितले. नगरपालिकेच्या सभागृहात व्यापार्यांची बैठक घेताना नगरसेवकांना का कळविले नाही?, संस्थेचे नुकसान होत असतानाही स्वच्छता सूचनेच्या डिजिटल बोर्डांचे बिल ठेकेदाराला देण्याच्या विषयाला सभेने नामंजुरी दिलेली असतानाही हे बिल अधिकार्यांनी का काढले? सुरवसे बिल्डिंग पाडण्याच्या कामाला नगरपालिकेच्या सभेत नामंजुरी दिली होती. भाविकांची शहरात गर्दी असताना देखील सुरवसे बिल्डिंग पाडण्यास अधिकार्यांनी परस्पर का मंजुरी दिली? असे प्रश्न सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अधिकार्यांना विचारले.त्याचबरोबर महावीरनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करणे, नगरपरिषदेच्या रुग्णालयात नवीन शववाहिका खरेदी करणे, शहरातील भुयारी गटार चेंबरची उंची वाढविणे, आषाढी यात्रा कालावधीत विविध कामे करण्यासाठी येणार्या खर्चास मंजुरी देणे, दलित वस्तीतील रस्त्याचे कॉँक्रिटीकरण तसेच विविध ठिकाणच्या रस्त्याचे कॉँक्रिटीकरण यासह अन्य विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच कराड रोड पंतनगरमधून जाणारा विकास योजनेतील १५ मी. रुंदीचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या विषयाला स्थगिती देण्यात आली आहे.नगरपालिकेचे वाचविले पैसेयात्रा कालावधीत स्वच्छतेच्या सूचनांचे डिजिटल बोर्ड बनविण्यासाठी बाजारात कमी दर असताना देखील अधिकार्यांनी जादा दर ठेकेदाराला दिला होता. ही बाब नगरसेविका सविता मोहोळकर यांनी पुढे आणून याबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली व डिजिटल बोर्डाचे बिल कमी दराने काढावे अशी विनंती केली. याची देखल घेत जिल्हाधिकार्यांनी इतर ठिकाणी दराची चौकशी करुन संबंधित ठेकेदराचे बिल कमी दराने काढले. यामुळे नगरपालिकेचे १ लाख ६२ हजार रुपये वाचले. यामुळे सर्व नगरसेवकांनी सविता मोहोळकर यांचे अभिनंदन केले.नवीपेठमध्ये निघणार गाळापंढरपूर शहर विकास योजना आरक्षण क्र. ६८ दुकान केंद्राचे (नवीपेठ) व आरक्षण क्र. २५ दुकान केंद्राचे बांधकाम बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर विकासाच्या कामास मंजुरी मिळाली आहे.