जनरल के व्ही कृष्णराव यांचं निधन
By Admin | Updated: January 30, 2016 22:03 IST2016-01-30T20:11:06+5:302016-01-30T22:03:12+5:30
निवृत्त लष्कर प्रमुख जनरल के व्ही कृष्णराव यांचं शनिवारी निधन झाले. जनरल के व्ही कृष्णराव यांची १९८१ साली लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

जनरल के व्ही कृष्णराव यांचं निधन
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - निवृत्त लष्कर प्रमुख जनरल के व्ही कृष्णराव यांचं शनिवारी निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. जनरल के व्ही कृष्णराव यांची १९८१ साली १४ वे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी भारतीय लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार जुलै १९८३ पर्यंत पाहिला. तसेच, ते चिफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षही होते.
जनरल के.व्ही कृष्णराव यांच्या निधनाने देशाने एक चांगला लष्कर प्रमुख गमावला आहे, अशा शब्दात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.