शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

जीडीपीची घसरगुंडी... 'देशवासीयांनी कमावलेल्या 'अर्थ'चा भाजपाने अनर्थ केला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 11:45 IST

भारतीय सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहीतील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. त्यामधून वरील निष्कर्ष निघाले आहेत. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांपैकी कृषिक्षेत्रवगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झालेली दिसून येत आहे

ठळक मुद्देभारतीय सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहीतील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. त्यामधून वरील निष्कर्ष निघाले आहेत. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांपैकी कृषिक्षेत्रवगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झालेली दिसून येत आहेकाँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जनतेने कष्टाने कमावलेल्या अर्थचा भाजपाने अनर्थ केला, असा टोला लगावला आहे. कोरोनाच्या अगोदरपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेला संपविण्यात आलंय.

नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बसला असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी घसरली आहे. आतापर्यंत झालेली अर्थव्यवस्थेची ही सर्वात मोठी घसरण होय. देशाच्या घसरलेल्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर टीका करण्यात येत आहे. 

भारतीय सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहीतील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. त्यामधून वरील निष्कर्ष निघाले आहेत. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांपैकी कृषिक्षेत्रवगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झालेली दिसून येत आहे. मागील वर्षी याच काळात भारतीय अर्थव्यवस्था ५.२ टक्क्यांनी वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर यावेळी झालेली घट ही खूपच मोठी आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. याचा फटका एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) कमी होण्यात बसण्याची अपेक्षा होतीच. या अपेक्षेपेक्षा जीडीपी मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. देशातील अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीवरुन काँग्रसने भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जनतेने कष्टाने कमावलेल्या अर्थचा भाजपाने अनर्थ केला, असा टोला लगावला आहे. कोरोनाच्या अगोदरपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेला संपविण्यात आलंय. असंघटीत क्षेत्रावर जाणीवपूर्वक अतिक्रमण करण्यात आलं. कारण, संघटीत क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या मोदींच्या मित्रांना याचा लाभ व्हावा, यासाठीच असंघटीत क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याचे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटलंय. तसेच, गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील नागरिकांना कमावलेल्या पैशाची भाजपाने विल्हेवाट लावल्याचा आरोपही खेरा यांनी केला आहे.  

दरम्यान, सन २०२०-२१ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचे एकूण देशांतर्गत उत्पादन २६.९० लाख कोटी रुपये एवढे राहिले. मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादन ३५.३५ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा २३.९ टक्क्यांनी संकोच झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही संकोच झालेला नाही. अनेक पतमापन संस्थांनी कोरोनामुळे अर्थव्यवस्था घट नोंदवेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

 कृषीवगळता अन्य सर्वच क्षेत्रांना बसला मोठा फटका

देशाच्या कृषिक्षेत्राने या तिमाहीत ३.४ टक्के एवढी वाढ दिली आहे. मागील वर्षी ही वाढ ३ टक्के एवढी होती. सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. हे क्षेत्र यंदा मात्र ५०.३ टक्क्यांनी घसरले आहे. उत्पादन क्षेत्रातही ३९.३ टक्क्यांनी घट झाली आहे. खाण क्षेत्र (२३.३ टक्के), ऊर्जा क्षेत्र (७ टक्के), व्यापार, हॉटेल, परिवहन, दळण वळण आणि सेवा क्षेत्रामध्ये ४७ टक्क्यांनी घट झाली आहे. आर्थिक क्षेत्र तसेच स्थावर मालमत्ता यामध्ये ५.३ टक्के तर सामान्य प्रशासन, संरक्षण आणि अन्य सेवांच्या क्षेत्रात १०.३ टक्के अशी घट झाली आहे. 

काळ मोठा कठीण आला

यंदाच्या पहिल्या तिमाहीत एकूण राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) २३ टक्क्यांची घट येण्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. जीडीपीमध्येच एवढी घसरण झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारचे करसंकलनच मोठ्या प्रमाणात कमी होईल. जीएसटी संकलन कमी होईल. केंद्र-राज्य सरकारचे उत्पन्न कमी झाल्याने मंदीसदृश स्थिती येण्याचा धोका दिसतो आहे. बेरोजगारी आणखी वाढणे, वेतन कपात असे फटके सर्व क्षेत्रात बसू लागतील. सरकारी करांमध्ये वाढ होऊ शकते. सरकारकडे पैसेच नसल्याने नोटा छापून घेण्याचे प्रमाण वाढवावे लागेल. चलन विस्तार झाला की भाववाढ होते, हा अर्थशास्त्रातला नियम आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. सर्वसामान्यांची क्रयशक्ती कमी होईल. मोठी घसरण होईल. सद्यस्थितीत बँकिंग क्षेत्र ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. ठेवींवर व्याजदर जास्त मिळणार नाही. कर्जे देताना बँकांना कमालीची सावधगिरी बाळगावी लागेल. नजीकच्या भविष्यात काही बँका अडचणीत आल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. या सगळ्या परिस्थितीत चीनशी खटका उडाला तर कोणत्याही क्षणी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळू शकते.- सीए डॉ. दिलीप सातभाई 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्थाBJPभाजपाcongressकाँग्रेस