शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी फक्त शेतकऱ्यांच्याच भरवशावर देशाची अर्थव्यवस्था, GDPमध्ये 40 वर्षांतील सर्वात मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 23:09 IST

जीडीपीमध्ये 40 वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, ग्रामीण भागातून चांगली बातमी आहे. यावर्षी केवळ कृषी हेच एकमेवर असे क्षेत्र आहे, जेथून सकारात्मक ग्रोथची शक्यता दिसून येते आहे.

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या काळात भारताचीच नाही, तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पहिल्या तिमाहीतील (एप्रिल-जून) अहवाल अत्यंत चिंताजनक आहे. जीडीपीमध्ये 40 वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, ग्रामीण भागातून चांगली बातमी आहे. यावर्षी केवळ कृषी हेच एकमेवर असे क्षेत्र आहे, जेथून सकारात्मक ग्रोथची शक्यता दिसून येत आहे. चांगल्या मॉन्सूनमुळे यावेळी कृषी क्षेत्रही वाढले आहे.  लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजूरही घरी गेले आहेत. यामुळेही शेतीच्या कामाला वेग आला आहे.

2019-20च्या पहिल्या तिमाहीत 5.2 टक्यांची तेजी -राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीनुसार, सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) 2019-20च्या या तिमाहीत 5.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. सरकारने कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी 25 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन जारी केला. याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या सर्वच स्थरांवर झाला आहे. निर्मिती क्षेत्रात सकल मूल्य वर्धनात (जीव्हीए) 2020-21च्या पहिल्या तिमाहीत 39.3 टक्क्यांची घसरण झाली. तर एक वर्षापूर्वी या तिमाहीत यात 3 टक्क्यांची वाढ झाली होती. 

कृषी क्षेत्रात 3.4 टक्क्यांची वाढ -या काळात कृषी क्षेत्रात 3.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी 2019-20च्या पहिल्या तिमाहीत 3 टक्क्यांची वाढ झाली होती. निर्मिती क्षेत्रात जीव्हीए वृद्धीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 50.3 टक्क्यांची घसरण झाली. तर गत वर्षी याच तिमाहीत 5.2 टक्क्यांची घसरण झाली होती. खान क्षेत्रातील उत्पादनात 23.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर एक वर्षापूर्वी 2019-20च्या याच तिमाहीत 4.7 टक्क्यांची वृद्धी झाली होती. वीज, गॅस, पाण्याचा पुरवठा आणि इतर सेवा क्षेत्रांत 2020-21च्या पहिल्या तिमाहीत 7 टक्क्याची घसरण झाली तर एक वर्षापूर्वी 2019-20च्या तिमाहीत यात 8.8 टक्क्याची वृद्धी झाली होती.

हॉटेल, परिवहनात 47 टक्क्यांची घसरणआकडेवारीनुसार, व्यापार, हॉटेल, परिवहन, संचार आणि प्रसारणाशी संबंधित सेवांमध्ये या तिमाहीत 47 टक्क्यांची घसरण झाली, तर एक वर्षापूर्वी याच तिमाहीत 3.5 टक्क्यांची वृद्धी झाली होती. आर्थिक, रिअल इस्टेटमध्ये 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत 5.3 टक्यांची घसरण झाली, तर एक वर्षापूर्वी याच तिमाहीत 6 टक्क्यांची वृद्धी झाली होती. लोक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवांतदेखील या तिमाहीत 10.3 टक्क्यांची घसरण झाली होती. तर एक वर्षापूर्वी 2019-20 च्या याच तिमाहीत यात 7.7 टक्क्यांची वाढ दिसून आली होती.

पहिल्या तिमाहीतील जीडीपी दर 26.90 लाख कोटी -एनएसओने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की 'स्थिर मूल्यावर (2011-12) जीडीपी 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत 26.90 लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. हा जीडीपी 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत 35.35 लाख कोटी रुपये एवढा होता. याचाच अर्थ यात 23.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर एक वर्षापूर्वी 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत यात 5.2 टक्क्यांची वाढ झाली होती.' मात्र, चीनच्या अर्थव्यवस्थेत एप्रिल-जूनच्या तिमाहीत 3.2 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. यापूर्वी जानेवारी-मार्च, 2020 च्या तिमाहीत 6.8 टक्क्यांची घसरण झाली होती.

टॅग्स :agricultureशेतीEconomyअर्थव्यवस्थाFarmerशेतकरीIndiaभारत