शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील बड्या रुग्णालयात परिचारीकांच्या 'मल्याळम' बोलण्यावर बंदी; राहुल गांधींसह काँग्रेसच्या दिग्गजांचा संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 10:41 IST

Delhi Hospital : नर्सिंग स्टाफच्या मल्याळम भाषेत संवाद साधण्याची तक्रार. सर्वाधिक रुग्णांना भाषा समजत नसल्याचं रुग्णालयाचं म्हणणं.

ठळक मुद्देनर्सिंग स्टाफच्या मल्याळम भाषेत संवाद साधण्याची तक्रार. सर्वाधिक रुग्णांना भाषा समजत नसल्याचं रुग्णालयाचं म्हणणं.

दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयानं नुकतंच एक पत्रक काढलं आहे. यामध्ये रुग्णालयात नर्सिंग स्टाफनं संवादासाठी केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर करण्यास सांगितलं आहे. असं न केल्यास कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचं त्यात नमूद केलं आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णालायल प्रशासनाला एक तक्रार मिळाली होती. यामध्ये नर्सिंग स्टाफ आपल्या राज्यातील भाषेचा वापर करत असल्यानं रुग्णांना समस्या निर्माण होत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर रुग्णालयानं हे पत्रक काढलं होतं. दरम्यान, यानंतर या प्रकरणी काँग्रेसनंदेखील उडी घेतली आहे.काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी या प्रकरणी दखल घेतली आहे. मल्याळम भाषाही तितकीच भारतीय भाषा आहे जितकी कोणती अन्य भाषा. भाषेच्या नावावर भेदभाव बंद केला गेला पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले. जीबी रुग्णालयाला यापूर्वी मिळालेल्या तक्रारीनंतर त्यांनी एक पत्रक काढलं आहे. 'कामाच्या ठिकाणी संवाद साधण्यासाठी मल्याळम भाषेचा वापर केला जात असल्याची तक्रार मिळाली आहे. बहुतांश रुग्णांना आणि अन्य लोकांना या भाषेचं ज्ञान नाही. यामुळे त्यांना समस्या निर्माण होत आहे. यामुळे संवाद साधण्यासाठी भाषेच्या रुपात केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करण्यात यावा. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,' असं यात नमूद करण्यात आलं आहे. 

जीबी पंत रुग्णालयाच्या नर्सिंग सुप्रिटेंडंड यांनी ५ जून रोजी हे पत्रक जारी केलं आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीदेखील याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. "भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात एक सरकारी संस्था आपल्या परिचारीकांना जे ते भाषा समजू शकतात अशा लोकांशीही त्यांच्या मातृभाषेत बोलू नका असं सांगणं आश्चर्यजनक आहे. हे मानवाधिकाराचं उल्लंघन आहे," असं शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं. तर दुसरीकडे काँह्रेसचे खासदार आणि पक्षाचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल यांनीदेखील यावर आक्षेप घेत केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीhospitalहॉस्पिटलRahul Gandhiराहुल गांधीShashi Tharoorशशी थरूरIndiaभारतcongressकाँग्रेस