शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

मुलाच्या लग्नात गौतम अदानींनी दान केले १० हजार कोटी; जाणून घ्या कुठे खर्च होणार एवढा पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 21:50 IST

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा मुलगा जीतचा विवाह पार पडला आहे.

Gautam Adani Son Marriage: आपल्या मुलाचा विवाह परंपरागत पद्धतीने आणि अत्यंत साधेपणे केला जाईल असे अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी महा कुंभमेळ्यात जाहीर केले होते. मुलाचे लग्न साधेपणे होईल असे जाहीर केल्याने हा विवाह भपकेबाज आणि खर्चिक पद्धतीने होईल या अफवांनाही त्यांनी पूर्णविराम दिला होता. त्यानंतर आता शब्दाला जागून गौतम अदानी यांनी या विवाहानिमित्त दहा हजार कोटी रुपये समाजाकरिता देण्याचे जाहीर केले. जीत गौतम अदानी याच्या विवाहानिमित्त गौतम अदानी यांनी समाजसेवेसाठी जाहीर केलेली ही रक्कम वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाणार आहे. 

गौतम अदानी हे जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील पायाभूत उपक्रमांसाठी या देणगीतील सर्वात जास्त रक्कम खर्च होणार आहे. या उपक्रमातून, समाजातील सर्व घटकांना परवडण्याजोग्या दरातील जागतिक दर्जाची रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालय, तसेच परवडणाऱ्या दरातील पण उच्च दर्जाच्या के ट्वेल्व्ह शाळा आणि कौशल्य विकास शिक्षण तसेच नोकरीची हमी देणाऱ्या जागतिक दर्जाच्या कौशल्य अकादमी स्थापन केल्या जातील, अशी माहिती समोर आली ाहे. मुलाच्या विवाह प्रसंगी गौतम अदाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. परमपिता परमेश्वराच्या आशीर्वादाने जीत आणि दिवा हे दोघे आज विवाहबद्ध झाले आहेत. हा विवाह आज नातलग आणि परिचित यांच्या उपस्थितीत पारंपारिक रीतीरिवाज आणि ज्येष्ठांच्या शुभ आशीर्वादात झाला. हा एक अत्यंत छोटा आणि वैयक्तिक घरगुती समारंभ होता. त्यामुळे इच्छा असूनही सर्व हितचिंतकांना या विवाहासाठी बोलवणे आम्हाला शक्य झाले नाही, त्यामुळे आम्हाला क्षमा करावी. पुत्री दिवा आणि जीत यांच्या विवाहानिमित्त आपण त्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत हीच माझी इच्छा आहे, असं गौतम अदानी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

या पोस्टमध्ये गौतम अदानी यांनी त्यांची सून दिवा यांचाही उल्लेख मुलगी असा केला. अहमदाबाद मधील अदानी शांतीग्राम वसाहतीमधील बेलवेदर क्लबमध्ये आज दुपारी जीत आणि दिवा यांचा विवाह सोहळा पार पडला. दिवा ही विख्यात हिरे व्यापारी जैमिन शहा याची कन्या आहे. हा विवाह अत्यंत साधेपणे आणि नेहमीच्या परंपरागत धार्मिक रीतीरिवाजांनुसार आणि नंतर परंपरागत गुजराती पद्धतीनुसार झाला. त्याला फक्त जवळचे नातलग आणि मित्र अशा मोजक्या मंडळींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या विवाहास बडे राजकारणी, परदेशी मुत्सद्दी, उद्योजक, सनदी अधिकारी, चित्रपट तारे तारका, करमणूक करणारे व्यावसायिक आणि अन्य सेलिब्रिटी उपस्थित नव्हते.

या विवाहाच्या दोन दिवस आधी गौतम अदानी यांनी यानिमित्त मंगल सेवा हा समाजसेवी उपक्रम जाहीर केला होता. याद्वारे ५०० विवाहित दिव्यांग वधूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सहाय्य पुरवले जाणार आहे. दरवर्षी एवढेच सहाय्य दिले जाणार असून विवाहाच्या निमित्ताने जीत याने या उपक्रमाची सुरुवात करताना २१ नवविवाहित अपंग महिला आणि त्यांच्या पतींची भेट घेऊन त्यांना सहाय्य दिले. 

जीत आणि दिवा यांनी विवाहानिमित्त समाजसेवी उपक्रमांनी आपल्या सहजीवनाची सुरुवात केली, याबद्दल गौतम अदाणी यांनी समाधान व्यक्त केले होते. गौतम अदाणी प्रयागराज येथे महा कुंभमेळ्यात २१ जानेवारी रोजी सहभागी झाले होते. तेव्हा, त्यांना विवाहानिमित्त सेलिब्रिटींचा महा कुंभमेळा जमेल का? असं विचारण्यात आलं होतं. त्यावर गौतम अदानी याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. 

आम्ही सर्वसामान्य माणसांप्रमाणेच आहोत. जीत येथे फक्त गंगामातेचे आशीर्वाद घेण्यासाठी आला आहे. त्याचा विवाह परंपरागत पद्धतीने साधेपणानेच होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. त्यानुसार हा विवाह साधेपणाने झाला. समाजसेवेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षणही कसे साजरे करावेत, हे गौतम अदानी यांनी दाखवून दिले आहे. संपत्तीचे प्रदर्शन करण्याऐवजी त्यांनी विचारपूर्वक समाजसेवेवर भर देऊन आदर्श निर्माण केल्याचे म्हटलं जात आहे. 

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीAdaniअदानीGujaratगुजरात