The 'gate' of the world's largest stadium collapsed just before the inauguration from Donald trump | जगातील सर्वांत मोठ्या स्टेडिअमचे 'गेट' उद्घाटनाआधीच कोसळले; ट्रम्प जाणार होते

जगातील सर्वांत मोठ्या स्टेडिअमचे 'गेट' उद्घाटनाआधीच कोसळले; ट्रम्प जाणार होते

अहमदाबाद : देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपाला येत असलेले सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष या स्टेडिअममध्ये येणार आहेत. मात्र, आज एक धक्कादाय़क घटना घडली आहे. या स्टेडिअममध्ये ज्या गेटमधून ट्रम्प जाणार होते ते तात्पुरते उभारलेले गेटच कोसळले आहे. यामुळे ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने सीआयए सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची शक्यता आहे. 


अहमदाबादमधील या मोटेरा स्टेडिअममध्ये ट्रम्प यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मोटेरा स्टेडिअमच्या बाहेर उभ्या केलेल्या तात्पुरत्या गेटमधून आत जाणार होते. हे गेटच शनिवारी कोसळले. या गेटच्या आसपास कोणीही नसल्याने दुर्घटना टळली आहे. दौऱ्याच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने चौकशी सुरू झाली आहे. 


गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदीअमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेव्हा टेक्सास येथे ह्यहाउडी मोदीह्ण हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच धर्तीवर हाउडी ट्रम्प हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. जगातील या दोन बड्या नेत्यांच्या हस्ते या स्टेडियमच्या उद्घाटनाचा प्रस्ताव आहे.


या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाख दहा हजार इतकी आहे. या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी ट्रम्प हे अहमदाबाद येथून सरळ हेलिकॉप्टरने स्टेडियमवर येतील. उद्घाटनासाठी येणाºया लोकांसाठी २ किमीच्या आत १७ पार्किंग प्लॉट तयार करण्यात आले आहेत.या प्लॉटमध्ये एक हजार बसेस आणि १० हजार चारचाकी उभ्या राहतील. व्हीव्हीआयपींसाठी विशेष ४ पार्किंग प्लॉट असतील. ही सर्व कामे जोरात सुरू आहेत.

English summary :
The 'gate' of the world's largest stadium collapsed just before the inauguration from Donald trump. CIA will take objection on trump security.

Web Title: The 'gate' of the world's largest stadium collapsed just before the inauguration from Donald trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.