शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सबसिडीतही घोटाळा, २६३ ग्राहकांचे अनुदान एकाच बँक खात्यावर

By admin | Updated: June 18, 2015 15:12 IST

एलपीजी गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याच्या योजनेतही भ्रष्टाचार झाल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १८ - एलपीजी गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याच्या योजनेतही भ्रष्टाचार झाल्याची घटना समोर आली आहे. गॅस वितरक एजन्सीत काम करणा-या कर्मचा-याने तब्बल २६३ ग्राहकांचे अनुदान स्वतःच्या खात्यात जमा केल्याचे समोर आले असून ही रक्कम २० लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. 
इंडियन ऑइलकडे उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये एलपीजी गॅस अनुदानातील गोंधळाबाबत असंख्य तक्रारी येत होत्या. याची दखल घेत इंडियन ऑइलने सखोल चौकशी केली. या चौकशीत सरयू इंडेन गॅस एजन्सीत काम करणा-या राहुल नामक तरुणाने २६३ गॅस ग्राहकांची माहिती भरताना स्वतःच्या बँक खात्याचा नंबर अपलोड केल्याचे उघड झाले. फेब्रुवारी ते मे या कालावधीत राहुलच्या खात्यात तब्बल २० लाख रुपये जमा झाले असून इंडियन ऑइलने राहुलचे बँक खाते गोठवले आहे. उत्तरप्रदेशमधील अन्य जिल्ह्यांमधूनही अशा तक्रारी आल्याने सर्व जिल्ह्याच्या विभागीय अधिका-यांना चौकशीचे आदेश दिल्याचे इंडियन ऑइलचे उत्तरप्रदेशमधील उपमहाप्रबंधक पी के झा यांनी स्थानिक वृत्तपत्राला सांगितले. जुलैपर्यंत या सर्व तक्रारींचा चौकशी अहवाल येईल व त्यानंतर संबंधीतांवर  कारवाई करु असे झा यांनी स्पष्ट केले. 
एलीपी गॅस सिलेंडरच्या अनुदानात भ्रष्टाचाराचे प्रकरण उत्तरप्रदेशसोबतच अन्य राज्यांमध्येही सुरु असल्याचा संशय आहे. पाटणा येथील एका गॅस एजन्सीतील ५०० ग्राहकांचे अनुदान एकाच बँक खात्यात जमा होत असल्याचे समजते. इंडियन ऑइलमधील सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार देशभरातील १२ हजार ग्राहकांचे अनुदान भलत्याच बँक खात्यांमध्ये जमा होत आहे. सखोल चौकशीनंतर हा आकडा लाखांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.