शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

देशात गॅस टंचाई, गोरपूरमध्ये सिलेंडरसाठी ग्राहकांमध्ये हाणामारी, एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:40 IST

Uttar Pradesh Crime News: अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर तेलटंचाई आणि गॅसची टंचाई जाणवू लागली आहे. भारतातही टंचाईचं हे संकट गंभीर रूप धारण करत आहे. तसेच देशभरात गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे गोंधळाची स्थिती आहे.

अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर तेलटंचाई आणि गॅसची टंचाई जाणवू लागली आहे. भारतातही टंचाईचं हे संकट गंभीर रूप धारण करत आहे. तसेच देशभरात गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे गोंधळाची स्थिती आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गॅस एजन्सींसमोर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. तसेच सिलेंडरवरून ग्राहकांमध्ये वादावादीही होताना दिसत आहे. दरम्यान, आज गोरखपूर येथील पीपीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आशिष इंडेन गॅस एजन्सीमध्ये आज सकाळी गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये हमरीतुमरी झाली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सकाळी ९.३० च्या सुमारास रांगेमध्ये जबरदस्तीने घुसण्याच्या प्रयत्नावरून दोन गटातील तरुणांमध्ये वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. ही घटना घडली तेव्हा पोलीसही तिथे उपस्थित होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेतले आणि सक्त ताकीद देऊन सोडून दिले.

पुरवठ्यामध्ये कपात झाल्याने सध्या गॅस एजन्सींसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. पीपीगंजमध्ये गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासूनच मोठमोठ्या रांगा लागत आहे. दरम्यान, काही लोकांनी रांग तोडून मध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याने वादाला तोंड फुटलं. त्यातून वाद एवढा वाढला की एका तरुणाला जमिनीवर पाडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी बळाचा वापर करत मारहाण करणाऱ्यांना तिथून बाजूला केले. तसेच घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Shortage Fuels Brawl: Customers Fight for Cylinders in Gorakhpur

Web Summary : Gas shortage due to international tensions sparks chaos. In Gorakhpur, customers clashed at a gas agency over cylinder access, resulting in physical altercations. Police intervened to control the situation amid surging demand.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीCylinderगॅस सिलेंडर