शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, फ्रीमध्ये स्कूटी; भाजपने राजस्थानमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 13:36 IST

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. सर्वपक्षीयांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यासाठी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा जयपूरमध्ये आले आहेत. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला संकल्प पत्र म्हटले आहे, भाजपने राजस्थानमध्ये जाहीरनाम्याला ‘आपनो आगे राजस्थान संकल्प पत्र’ असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळावर त्यांनी टीका केली. दरम्यान, केंद्रीय योजनांचा उल्लेख करताना अध्यक्ष नड्डा म्हणाले की, भाजपने योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यांनी केंद्र सरकारने दिलेल्या नियुक्तीपत्रांचा उल्लेख करून सात महिन्यांत सहा लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्याचे सांगितले.

प्रचाराचा काळ! आता तेलंगणात बीआरएस आमदाराच्या घरी आयकर विभाग पोहोचला; छापेमारी सुरू

यावेळी बोलताना जेपी नड्डा म्हणाले की, आम्हाला राजस्थानमध्ये डबल इंजिनचे सरकार हवे आहे. यावेळी त्यांनी अशोक गेहलोत सरकारवर घोटाळ्याचा आरोप केला. भाजप सरकारच्या काळात जनतेला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या जाहीरनाम्याचे तीन स्तंभ आहेत. यामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास विकासाचा मंत्र आहे दुसरे, गावातील गरीब, वंचित, शोषित, अनुसूचित जाती, जमाती, महिलांचे सक्षमीकरण करणे, आणि तिसर्‍यामध्ये पायाभूत सुविधांमध्ये भर घालणे समाविष्ट आहे, असंही नड्डा म्हणाले. 

जाहीरनाम्यात काय आहे?

'राज्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव झाला त्यांना योग्य मोबदला देण्यासाठी नुकसानभरपाईचे धोरण आणणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला पोलिस ठाणे आणि महिला डेस्क आणि सर्व प्रमुख शहरांमध्ये रोमियोविरोधी पथके तयार करण्यात येणार आहेत. लाडो इन्सेंटिव्ह योजना सुरू केली जाईल ज्या अंतर्गत मुलीच्या जन्मावर २ लाख रुपयांची बचत मोडद्वारे आर्थिक मदत दिली जाईल. मुख्यमंत्री मोफत स्कूटी योजनेंतर्गत बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींना स्कूटी देण्यात येणार आहे.लखपती दीदी योजनेअंतर्गत ६ लाखांहून अधिक ग्रामीण महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत सर्व गरीब कुटुंबातील महिलांना ४५० रुपयांमध्ये सिलिंडर दिले जाणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना गणवेश इत्यादीसाठी १२०० रुपये वार्षिक मदत दिली जाईल.  आमचे सरकार आल्यास पेपरफुटी, खत, मिड डे मील, खाणकाम, पीएम हाऊसिंग, जल जीवन आदी घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली जाईल, असंही जेपी नड्डा म्हणाले. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही पर्यटन कौशल्य अभ्यासक्रम तयार करून पाच लाख तरुणांना प्रशिक्षित करणार आहोत आणि त्यासोबतच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत, असंही या घोषणापत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाcongressकाँग्रेस