गॅस सिलिंडरच्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू; विवाह समारंभावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:08 IST2018-02-18T00:07:43+5:302018-02-18T00:08:02+5:30
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात ब्यावर भागात एका विवाह समारंभात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन इमारत कोसळली. यात ९ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील १३ जण बेपत्ता आहेत. मृतांपैकी सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

गॅस सिलिंडरच्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू; विवाह समारंभावर शोककळा
जयपूर : राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात ब्यावर भागात एका विवाह समारंभात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन इमारत कोसळली. यात ९ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील १३ जण बेपत्ता आहेत. मृतांपैकी सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
स्वयंपाक्याकडून एका सिलिंडरमधून दुसºया सिलिंडरमध्ये गॅस भरताना ही दुर्घटना झाली, असे तपासातून समोर आले आहे.
नंदनगर भागातील कुमावत पंचायत भवनमध्ये विवाह समारंभ सुरु होता. काही महिला मेंदी काढत होत्या, तर काही गाणी गात होत्या. हा स्फोट तिसºया मजल्यावर झाला. तेथील छत आणि भिंत कोसळून लोक या ढिगाºयाखाली दबले गेले. इथे आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी गौरव गोयल यांनी सांगितले की, घटनास्थळावरुन
दोन महिला, तीन मुले आणि
एका पुरुषाचा मृतदेह ताब्यात
घेण्यात आला आहे. मदतकार्य
सुरु आहे. ढिगारे हटविण्याचे काम सुरु आहे. सिलिंडर का फुटले याचा तपास सुरु आहे. दरम्यान, हा
स्फोट एवढा मोठा होता की, इमारतीबाहेरील दोन कार आणि आजूबाजूच्या इमारतींचेही नुकसान झाले. (वृत्तसंस्था)