बहिणीवरील गँगरेपचा बदला घेण्यासाठी केला गँगरेप

By Admin | Updated: September 2, 2014 14:52 IST2014-09-02T12:38:14+5:302014-09-02T14:52:13+5:30

बहिणीवरील गँगरेपचा बदला घेण्यासाठी उत्तरप्रदेशमधील एका तरुणाने मित्रांच्या साथीने आरोपीच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Gangrape to take revenge for gang rape | बहिणीवरील गँगरेपचा बदला घेण्यासाठी केला गँगरेप

बहिणीवरील गँगरेपचा बदला घेण्यासाठी केला गँगरेप

>ऑनलाइन लोकमत
मुजफ्फरनगर, दि. २ -  बहिणीवरील गँगरेपचा बदला घेण्यासाठी उत्तरप्रदेशमधील एका तरुणाने मित्रांच्या साथीने आरोपीच्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या पिडीत तरुणीला पोलिसांनी बराच वेळ बसवून ठेवत तक्रार नोंदवण्यास विलंब केला. प्रसारमाध्यमांनी पोलिस ठाण्यात धाव घेतल्यावर पोलिसांनी मुलीची तक्रार नोंदवून घेत तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले, 
मुजफ्फरनगरमधील फिरोजाबाद गावात राहणा-या १९ वर्षाच्या तरुणीचे रविवारी रात्री सात तरुणांनी बंदूकीचा धाक दाखवून अपहरण केले.यानंतर तिला गावाजवळील जंगलात नेऊन त्यापैकी तिघा नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला व तिला जंगलात सोडून पळून गेले. यानंतर सोमवारी सकाळी पिडीत तरुणीने चालत गाव गाठले व हा प्रकार उघड झाला. 
पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी तिचा भाऊ अर्जुन व त्याच्या दोन मित्रांविरोधात तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार तसेच हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याचा बदला घेण्यासाठी तिच्यावर बलात्कार झाला. अर्जुनने अत्याचार केलेल्या तरुणीच्या भावाने अर्जुनच्या बहिणीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी गुलजार, शाहिद आणि गुड्डू या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या दोन्ही सामूहिक बलात्कारातील एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. 

Web Title: Gangrape to take revenge for gang rape