नाशिकच्या गुंडाला गावठी पिस्तूलासह अटक

By Admin | Updated: September 2, 2015 23:31 IST2015-09-02T23:31:53+5:302015-09-02T23:31:53+5:30

धुळे : गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने शहरात आलेल्या नाशिकच्या कुख्यात गंुड राकेश अंबालाल सोनार (२३, ह.मु. सीएमइ, दापोडी, पुणे) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन गावठी पिस्तूलांसह अटक केली.

Ganges village of Nashik arrested with pistol | नाशिकच्या गुंडाला गावठी पिस्तूलासह अटक

नाशिकच्या गुंडाला गावठी पिस्तूलासह अटक

ळे : गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने शहरात आलेल्या नाशिकच्या कुख्यात गंुड राकेश अंबालाल सोनार (२३, ह.मु. सीएमइ, दापोडी, पुणे) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन गावठी पिस्तूलांसह अटक केली.




पुण्याहून एक संशयित दोन गावठी पिस्तूलांसह धुळ्यात दाखल होणार असल्याची माहिती खबर्‍याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव चौफुलीवर रात्री सापळा लावला होता. पहाटे ३ वाजता पुण्याकडून आराम बसमधून आलेल्या याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती तो नाशिक शहरातील गुंडांच्या टोळ्यांमध्ये काम करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेला ४० हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे दोन पिस्तूल मिळाले. (प्रतिनिधी)

Web Title: Ganges village of Nashik arrested with pistol