शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गंगा नदी कधीच दूषित होत नाही, हे 3 घटक ठेवतात स्वच्छ; संशोधनातून समोर आली माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:54 IST

'राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्थे'ने 12 वर्षे केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

Ganga River : हजारो वर्षांपासून भारतातील विविध राज्यांमधून वाहणारी गंगा नदी कोट्यवधी भारतीयांसाठी जीवनदायिनी आहेच, शिवाय तिला धार्मिक महत्त्वही तेवढेच आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये गंगा नदीचा उल्लेख आढळतो. हिंदूंसाठी गंगाजल अत्यंत पवित्र आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी लाखो भाविक गंगेत स्नान करुनही गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. हे पाणी इतके स्वच्छ कसे राहते, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. एका अभ्यासातून महत्वाची माहिती समोर आली आहे.

हिमालयातून उगम पावणारी गंगा नदी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. गंगेचे पाणी अनेक महिने साठवता येते. ते खराब होत नाही. इतकेच नव्हे तर धार्मिक उत्सवांमध्ये दरवर्षी लाखो भाविक स्नान करतात, तरीही यातून साथीचा रोग किंवा इतर रोग पसरत नाही. विशेष म्हणजे, गंगा तिच्यात असलेल्या तीन घटकांमुळे स्वच्छ राहते.

स्वतःला स्वच्छ ठेवण्याचा गुण‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग अँड रिसर्च’च्या (NIEERI) शास्त्रज्ञांनी गंगा नदीवर संशोधन केले. यातून गंगेच्या पाण्यात स्वतःला स्वच्छ ठेवण्याची गुणवत्ता असल्याचे समोर आले. गंगेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात 'बॅक्टेरियोफेज' असते, जे गंगेचे पाणी प्रदूषित होण्यापासून रोखते. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ गंगा मिशन’ अंतर्गत निरीचे संशोधक डॉ. कृष्णा खैरनार यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनासाठी गंगा तीन टप्प्यात विभागली गेली. पहिला गोमुख ते हरिद्वार, दुसरा हरिद्वार ते पाटणा आणि तिसरा पटना ते गंगासागर.

50 वेगवेगळ्या ठिकाणचे नमुनेडॉ. खैरनार यांनी सांगितल्यानुसार, संशोधकांनी 50 वेगवेगळ्या ठिकाणांहून गंगाजल आणि नदीच्या पात्रातील वाळू आणि मातीचे नमुने घेतले. संसोधकांना आढळले की, गंगा नदीमध्ये स्वतःला शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत. संशोधकाने गेल्या कुंभमेळ्यातही नमुने गोळा केले होते. संशोधकांना गंगेच्या पाण्यात बॅक्टेरियोफेजेस आढळले, जे पाण्यातील जंतू नष्ट करतात. यामुळे गंगा कधी दूषित होत नाही.

ऑक्सिजनचे भरपूर प्रमाणडॉ. खैरनार पुढे म्हणाले की, यासोबतच गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण खूप जास्त असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनची पातळी 20 मिलीग्राम प्रति लिटरपर्यंत आहे. यासोबतच टेरपीन नावाचे फायटोकेमिकलही सापडले. ही तीन तत्त्वे गंगेचे पाणी शुद्ध ठेवतात. यामुळे गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. विशेष म्हणजे, संशोधकांनी यमुना आणि नर्मदा नद्यांच्या पाण्यावरही संशोधन केले. मात्र, या नद्यांच्या पाण्यात गंगेच्या पाण्यात असलेले घटक अत्यंत कमी प्रमाणात असल्याचे समोर आले आहे.

गंगेवरील संशोधन 12 वर्षे चाललेसध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ 2025 चे आयोजन केले जात आहे. महाकुंभत दररोज लाखो भाविक गंगेत स्नान करतात. मात्र गंगेचे पाणी पाच किलोमीटर अंतरापर्यंत गेल्यावर आपोआप शुद्ध होते. गंगेतील तीन घटक नदीला लगेच शुद्ध करतात. संशोधकांनी 12 वर्षांच्या मेहनतीतून आणि संशोधनातून ही महत्वाची बाब शोधून काढली आहे. 

टॅग्स :riverनदीIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशKumbh Melaकुंभ मेळा