शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

50 वर्षांपूर्वी हरवलेल्या प्लुटोनियममुळे होत आहे गंगा प्रदूषित ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 13:00 IST

गंगेतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. आता 50 वर्षांपूर्वी हरवलेल्या किरणोत्सारी प्लुटोनिमच्या उपकरणामुळे गंगा प्रदूषित होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

देहराडून - भारतीय जनमानसात गंगा नदीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे. मात्र देवीचा दर्जा असलेली गंगा नदी विविध कारणांमुळे प्रदूषित झाली आहे. अनेक योजना आणि कोट्यवधी रुपये खर्च करूनही अद्याप गंगा नदी स्वच्छ झालेली नाही. उलट गंगेतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. आता 50 वर्षांपूर्वी हरवलेल्या किरणोत्सारी प्लुटोनिमच्या उपकरणामुळे गंगा प्रदूषित होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सत्पाल महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत 1965 साली अयशस्वी ठरलेल्या नंदादेवी अभियानाचा उल्लेख करत गंगेच्या प्रदूषणामागील संभाव्य कारणांपैकी हे एक कारण असल्याचे म्हटले आहे. 1965 साली अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयए आणि भारताची गुप्तहेर संस्था आयबी यांनी चीनवर नजर ठेवणयासाठी नंदादेवी शिखरावर परमाणू संचालित हेरगिरी यंत्र स्थापन करण्यासाठी गुप्त मोहीम राबवली होती. मात्र या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली. त्यामुळे पुन्हा कधीतरी प्रयत्न करण्याच्या इराद्याने शास्त्रज्ञ अणुइंधनावर चालणारा जनरेटर आणि प्लुटोनियम कॅप्सूल तिथेच सोडून माघारी परतले. मात्र शास्त्रज्ञांनी मोहीम पुन्हा सुरू करून ते त्या ठिकाणी गेले असता जनरेटर आणि प्लुटोनियम कॅप्सुल हरवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  प्लुटोनियम कॅप्सुलचे वयोमान 100 वर्षांहून अधिक असते, त्यामुळे ही कॅप्सुल बर्फात दबलेली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ही गंभीर बाब असल्याचे सांगत सत्पाल महाराज यांनी सक्रीय प्लुटोनियममधून किरणोत्सर्ग होण्याची भीती मोदींशी झालेल्या चर्चेदरम्यान व्यक्त केली. या प्लुटोनियममुळे नंदादेवी पर्वत रांगांमधून गंतेत येणाऱा बर्फ प्रदूषित होत असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच या प्रकरणी अभ्यास करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सत्पाल महाराज यांनी मोदींकडे केली.     

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतnewsबातम्या