गंगेच्या मुख्य स्त्रोत असलेल्या गंगोत्री हिमनदीबद्दल चिंता वाढवणारी बाब एका संशोधनात दिसून आली आहे. गंगोत्री ग्लेशियर मागील ४० वर्षांत १० टक्क्यांनी वितळले असून, हे पर्यावरण बदलामुळे होत आहे. आयआयटी इंदूर आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या नव्या अभ्यासात हे आढळून आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयआयटी इंदूरच्या ग्लेशी हायड्रो-क्लायमेट संशोधन केंद्राचे पारूल विंजे यांच्या नेतृत्वाखाली टीमने हा अभ्यास केला. जर्नल ऑफ इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेन्सिंगमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.
या अभ्यासात अमेरिकेतील चार विद्यापीठातील आणि नेपाळच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटेन डेव्हलपमेंटचे शास्त्रज्ञ यात सहभागी झाले होते. उपग्रह आणि वस्तुनिष्ठ आकडेवारीचा वापर करून गंगोत्री ग्लेशियर सिस्टिमचे विश्लेषण केले गेले.
गंगोत्री ग्लेशियरमध्ये कोणते बदल होत आहेत?
मागील ४० वर्षात गंगोत्रीच्या एकूण प्रवाही पाण्यात बर्फ वितळून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. बर्फ वितळून गंगेत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण ६४ टक्के आहे. पण, बर्फ वितळून पात्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण १९८०-९० मध्ये ७३ टक्के होते. ते कमी होऊन २०१०-२० मध्ये ६३ टक्क्यांवर आले आहे.
२०००-२०१० मध्ये बर्फ वितळून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण ५२ टक्क्यांवर गेले होते. ते २०१०-२० मध्ये वाढून ६३ टक्के झाले आहे. २००१-२०२० या काळात गंगोत्रीच्या क्षेत्रातील तापमान १९८०-२००० या तुलनेत ०.५ अंश सेल्सिअस इतके वाढले. त्यामुळे उन्हाळ्यात बर्फ वितळण्यास सुरूवात होते, आता हे ऑगस्ट ते जुलै दरम्यान बदलले आहे.
जागतिक पातळीवर होत असलेल्या पर्यावरण बदलांचा परिणाम गंगोत्री ग्लेशियर होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात होणारी हिमवृष्टी कमी होत आहे. तापमान वाढल्यामुळे बर्फाचा स्तर कमी बनू लागला आहे. त्यामुळे बर्फ वितळून येणारे पाणी कमी झाले आहे.
गंगोत्री ग्लेशियर उत्तर भारतात पाण्याचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. कारण या भागातून गंगा वाहते आणि गंगेत पाणी गंगोत्री हिमनदीतून येते. बर्फ वितळून येणारे पाणी कमी होत असून, पावसावर अवलंबित्व वाढल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. गंगेच्या खोऱ्यात लाखो लोक शेती करतात, त्यावर परिणाम होईल.