The gang war in terrorism ... the assassination of the second terrorist | दहशतवाद्यांमध्येही टोळीयुद्ध... दुसऱ्या दहशतवाद्याची हत्या
दहशतवाद्यांमध्येही टोळीयुद्ध... दुसऱ्या दहशतवाद्याची हत्या

जम्मू काश्मिरमध्ये आज एका व्यक्तीची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. हा व्यक्तीही नंतर दहशतवादीच असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. 
आसिफ नाझीर दार असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याची आज दुपारी श्रीनगरमधील हजरतबल येथे दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सुरुवातीला दार याची ओळख पटली नव्हती. तपासानंतर तो जानेवारी 2017 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याचे समोर आले. सुरुवातीला तो हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. नंतर तो. इसा फाझीली गटामध्ये सामील झाला. त्याच्याजवळून एक पिस्तुलही जप्त करण्यात आले आहे. 


दरम्यान, आणखी एका घटनेत दहशतवाद्यांनी पुलवामाच्या मुर्रन चौकात एका महिलेला गोळ्या घातल्या. ही महिला जखमी झाली असून तिच्यावर श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
 


Web Title: The gang war in terrorism ... the assassination of the second terrorist
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.