युपीत महिलेवर सामूहिक बलात्कार, निर्वस्त्र अवस्थेत झाडाला बांधले
By Admin | Updated: August 19, 2014 12:12 IST2014-08-19T08:55:54+5:302014-08-19T12:12:39+5:30
उत्तर प्रदेशात काही नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला निर्वस्त्र अवस्थेत झाडाला टांगून ठेवल्याची धक्कादायक घटना आली आहे.

युपीत महिलेवर सामूहिक बलात्कार, निर्वस्त्र अवस्थेत झाडाला बांधले
ऑनलाइन लोकमत
कन्नौज (उत्तर प्रदेश), दि. १९ - उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून काही नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला निर्वस्त्र अवस्थेत झाडाला टांगून ठेवल्याची धक्कादायक घटना आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांचा मतदारसंघ असलेल्या कन्नौज जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नौजमधील उमरडा गावात १६- १७ ऑगस्ट रोजी तीन नराधमांनी ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार केला व त्यानंतर तिला निर्वस्त्र अवस्थेत एका झाडाला बांधून ते तिघे पळून गेले. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. ती व्यक्ती एका शाळेत शिक्षक असून गावच्या प्रमुखाचा मुलगा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीडित महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.