दिल्लीत फ्लॅटमध्ये मुंबईच्या महिलेवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: April 17, 2016 20:53 IST2016-04-17T20:37:37+5:302016-04-17T20:53:03+5:30
मुंबईतील एका २६ वर्षीय महिलेवर दिल्लीतील फ्लॅटमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगरमधील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली.

दिल्लीत फ्लॅटमध्ये मुंबईच्या महिलेवर सामूहिक बलात्कार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - मुंबईतील एका २६ वर्षीय महिलेवर दिल्लीतील फ्लॅटमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगरमधील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. महिलेला जबदरस्तीने दारु पाजून दोघा नराधमांनी तिच्यावर शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार केला.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी पोलिसांनी एका कॉंट्रेक्टरला अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहे. दुसरा फरार आरोपी महापालिकेत अभियंता आहे असे सूत्रांनी सांगितले. कॉंट्रेक्टर आणि पिडीत महिलेची ओळख होती. अत्याचारामध्ये महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आरोपींनी पिडीत महिलेला अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी भाग पाडले. पिडीतमहिला दिल्लीच्या सफदरजंग येथे दुस-या महिलेसोबत भाडयाच्या घरात रहात होती. सात महिन्यांपूर्वी ती दिल्लीत आली होती. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार मुंबईमध्ये असताना तिची फेसबुकवरुन कॉंन्ट्रेक्टर मनीष बरोबर ओळख झाली.
मनीषने मैत्री वाढवून फेसबुकवरुन पिडीत महिलेबरोबर चॅटिंग सुरु केले. दोघांनी एकमेकांना आपआपले मोबाईल नंबरही दिले. काही आठवडयांनी मनीषने महिलेला विवाहाची मागणी घातली आणि दिल्लीला येण्यास सांगितले. मनीषने संबंधित महिलेला तिच्या सर्व खर्चाचा भार उचलण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पिडीत महिला रहाण्यासाठी दिल्लीला आली असे पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी मनीषने विवाहाबद्दल चर्चा करण्यासाठी महिलेला जुन्या राजेंद्र नगरमधील फ्लॅटवर बोलवले. महिला फ्लॅटवर गेल्यानंतर मनीषचा मित्र तिथे आला व त्याने जबरदस्ती सुरु केली. महिलेने त्याला विरोध केला. त्यानंतर मनीषने पिडीतेला अपशब्द सुनावले व दोघांनी तिला दारु पिण्यास भाग पाडले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.
पिडीत महिलेने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली आणि पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. रस्त्यावर पोलिसांना ही महिला सापडली तेव्हा ती मद्याच्या नशेत होती असे अधिका-याने सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. राजेंद्र नगर पोलिस स्थानकात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.