शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

दरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: March 15, 2015 01:46 IST

पोलीस दरोडेखोरांच्या टोळीतील सदस्यांचा शोध घेत असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. जिल्हाधिकारी पी.बी. सलीम यांनी ही माहिती दिली.

रानाघाट (कोलकाता) : नदिया जिल्ह्यातील गंगनापूर येथील कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते व रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.पोलीस दरोडेखोरांच्या टोळीतील सदस्यांचा शोध घेत असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. जिल्हाधिकारी पी.बी. सलीम यांनी ही माहिती दिली. ज्या कॉन्व्हेंटमध्ये ही काळीमा फासणारी घटना घडली ते रानाघाट उपविभागात आहे. शाळेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास दरोडेखोरांची ही टोळी शाळेत घुसली आणि त्यांच्यापैकी तीन-चार लोकांनी पीडित ननला पहिले त्रास दिला आणि नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. या दरोडेखोरांनी कपाटात ठेवलेले १२ लाख रुपयेही लुटून नेले. (वृत्तसंस्था)सकाळी संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेच्या वसतिगृहातील अधिकाऱ्यांनी या वयस्कर ननला रानाघाट रुग्णालयात भरती केले. या घटनेची इत्थंभूत माहिती मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे संपूर्ण क्षेत्रात पसरले. संतप्त विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी राष्ट्रीय महामार्ग ३४ आणि सियालदाह-रानाघाट रेल्वे मार्गावर दुपारी १२ वाजतापासून चक्काजाम आंदोलन पुकारले. राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी या घटनेची तीव्र शब्दात निंदा करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.दोषींवर कठोर कारवाई-मुख्यमंत्रीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ननवरील सामूहिक बलात्काराचे हे प्रकरण धक्कादायक असल्याचे सांगून या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘मी या अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय घटनेची तीव्र शब्दात निंदा करते. आम्ही या प्रकरणाच्या सीआयडीमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारांविरुद्ध त्वरित आणि ठोस कारवाई केली जाईल.’ ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल