शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

लोकसभा हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक धक्का; 64 कोटींची संपत्ती होणार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 7:59 AM

2005 मध्ये हरियाणाच्या तत्कालीन भूपेंद्र सिंह हुड्डा सरकारने कायदे धाब्यावर बसवून ही संपत्ती गांधी परिवाराच्या मालकीच्या एसोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ला देण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीत हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक झटका बसला आहे. ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी हरियाणाच्या पंचकुला येथील 64.93 कोटींची संपत्ती ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ईडीने नुकतेच रॉबर्ट वड्रा यांचा जामीन रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. 

2005 मध्ये हरियाणाच्या तत्कालीन भूपेंद्र सिंह हुड्डा सरकारने कायदे धाब्यावर बसवून ही संपत्ती गांधी परिवाराच्या मालकीच्या एसोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ला देण्यात आली होती. ही संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ध न्यायिक प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. हे प्रकरण पंचकुलामध्ये एजेएलला हिंदी वृत्तपत्र नॅशनल हेराल्ड आणि नवजीवनच्या प्रकाशनासाठी जमीन देण्याशी संबिधीत आहे. एजेएलवर कथितरित्या गांधी परिवार आणि काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचे नियंत्रण असल्याचा आरोप होत आहे. 

एक डिसेंबर 2018 मध्ये पीएमएलएनुसार पंचकुलामध्ये सेक्टर 6 मध्ये सी-17 प्लॉटला जप्त करण्याचा आदेश देण्यात आला होता. आता  ही कारवाई करण्यास मनी लाँड्रिंग कायद्यानुसार मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ईडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी सीबीआयने हुडा आणि इतरांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामुळे ईडीने कारवाई सुरु केली तरीही न्यायालयाच्या निर्णयानंतरच ही जमीन सरकारच्या ताब्यात देता येणार आहे. 

काय आहे प्रकरण 1982 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री भजनलाल यांनी ही जमीन एजेएलला दिली होती. मात्र, 10 वर्षे काहीच बांधकाम झाले नसल्याने ती पुन्हा हरियाणा अर्बन डेवलपमेंट प्राधिकरणने मागे घेतली होती. 2005 मध्ये पुन्हा विरोध करूनही हुड्डा यांनी ही जमीन 1982 चीच किंमत लावत एजेएलला दिली होती. 64.93 कोटींची ही जमीन 59.39 लाख रुपयांना देण्यात आली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी