शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लपाछपी ठरली जीवघेणी; पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू,वडिलांनी केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 12:46 IST

लपाछपीसारख्या खेळामुळे एका कुटुंबामध्ये भयानक घटना घडली आहे. हा खेळ खेळत असताना दोन वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देलपाछपी खेळादरम्यान घडली भयानक दुर्घटना पाण्याच्या टाकीत बुडून 2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू,वडिलांनी केली आत्महत्यावडिलांना पंख्याला गळफास घेऊन संपवलं आयुष्य

कोईम्बतूर - लपाछपीसारख्या खेळामुळे एका कुटुंबामध्ये भयानक घटना घडली आहे. हा खेळ खेळत असताना दोन वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलाच्या मृत्यूचा धक्का पचवू न शकल्यानं त्याच्या वडिलांनाही आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील ही घटना आहे. मनिकंदन (वय 32 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. मनिकंदन हे घरामध्ये मुलगी देवदर्शिनी (वय 5 वर्ष)सोबत लपाछपीचा खेळ खेळत होते. यावेळेस त्यांचा मुलगा देजश्विन(वय 2 वर्ष) घरामध्येच खेळत होता.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीसोबत खेळताना मनिकंदन यांना लक्षात आले की त्यांचा मुलगा गायब झाला आहे. यानंतर त्यांनी तातडीनं मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान, त्यांना देजश्विन उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडालेला दिसला. मनिकंदन यांना मुलाच्या मृत्युचा जबरदस्त धक्का बसला. यावेळेस त्यांनी आपल्या मुलीला आवाज न करता खेळ सुरू ठेवण्यास सांगितले. स्वतः लपत असल्याचं सांगत त्यांनी मुलीला शोधायला सांगितले. यानंतर मनिकंदन एका खोलीत जाऊन लपले, पण तेथून ते बाहेर आलेच नाहीत. बराच प्रयत्न करुन बाबा सापडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीनं आईकडे धाव घेतली.  

6 वर्षांपूर्वीच झाले होते लग्नमनिकंदन यांच्या पत्नीनंही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. अखेर त्यांनी खोलीची खिडकीतून उघडली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, मनिकंदन यांनी पंख्याला गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. आरडाओरडा करत त्यांच्या पत्नीनं शेजाऱ्यांना बोलावलं. यानंतर मुलाचा शोध घेतला असता त्यांचं दोन वर्षांचं बाळ पाण्याच्या टाकीत बुडालेलं दिसलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 वर्षांपूर्वीच या दाम्पत्याचं लग्न झाले होते. मुलाच्या मृत्युचा धक्का पचवू न शकल्यानं मनिकंदनही यांनीही आत्महत्या केली. दरम्यान,वडील-मुलगा दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी ते पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत.  

टॅग्स :Suicideआत्महत्याDeathमृत्यूAccidentअपघातTamilnaduतामिळनाडू