जामनगरमध्ये गजसेवकांचे महासंमेलन; वनतारा आणि प्रोजेक्ट एलिफंटतर्फे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:11 IST2025-07-31T08:11:11+5:302025-07-31T08:11:26+5:30
सध्या वनतारामध्ये २५० हून अधिक हत्तींची सेवा केली जात आहे, ज्यांची देखभाल ५०० पेक्षा अधिक प्रशिक्षित कर्मचारी करतात.

जामनगरमध्ये गजसेवकांचे महासंमेलन; वनतारा आणि प्रोजेक्ट एलिफंटतर्फे आयोजन
अहमदाबाद : अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील भारतातील अग्रगण्य वन्यजीव बचाव व संवर्धन केंद्र वनतारा आणि भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या प्रोजेक्ट एलिफंटच्या संयुक्त विद्यमाने ‘वनतारा गजराज संमेलन’ या पाच दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जामनगर येथे करण्यात आले आहे.
हत्तींच्या सेवा आणि संवर्धनाला समर्पित असलेला हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
या शिबिरात १०० हून अधिक महावत व हत्तीविषयक तज्ज्ञ पारंपरिक तसेच आधुनिक वैज्ञानिक पद्धतींच्या साहाय्याने हत्तींच्या काळजी व व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षणानंतर सर्व सहभागींपर्यंत अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येईल.
ही तर पायाभरणी
वनताराचे सीईओ विवान करानी यांनी सांगितले, ‘हे संमेलन केवळ प्रशिक्षणाचा उपक्रम नाही, तर करुणा आणि संवेदनशीलतेच्या भावी युगाची पायाभरणी आहे. हा कार्यक्रम राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टच्या परिसरात पार पडत आहे.
२५० हत्तींची सेवा
सध्या वनतारामध्ये २५० हून अधिक हत्तींची सेवा केली जात आहे, ज्यांची देखभाल ५०० पेक्षा अधिक प्रशिक्षित कर्मचारी करतात. याशिवाय आफ्रिकेतील काँगो देशातून वन्यजीव अधिकारी व तज्ज्ञही प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत.