शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

गगनयान मोहीम; तीन भारतीय अंतराळवीर झेपावणार अवकाशात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:24 IST

२०२२चे लक्ष्य ठेवून ‘इस्रो’ची तयारी; सात दिवसांच्या सफरीनंतर उतरणार अरबी समुद्रात

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीरांना सोबत घेऊन अंतराळयान अवकाशात पाठविण्याची ‘गगनयान’ ही महत्त्वाकांक्षी योजना इस्रोने आखली असून, २०२२ चे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून जय्यत तयारी सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात ‘गगनयान’ची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून २०२२ मध्ये वा त्याआधीच भारतातून, भारतीय यानातून भारताचा पहिला सुपुत्र वा सुकन्या अंतराळात झेपावेल आणि तेथे तिरंगा फडकवेल.

पंतप्रधानांच्या या योजनेचा तपशील अणुऊर्जा व अंतराळ संशोधन खात्यांचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी जाहीर केला. मानवाला अंतराळात पाठविण्याची ही मोहीम १० हजार कोटी रुपयांहून कमी खर्चात फत्ते करण्याचे उद्दिष्ट आहे. मोहीम यशस्वी झाल्यास मानवासह अंतराळयान सोडणारा भारत हा अमेरिका, रशिया व चीननंतर चौथा देश ठरेल.ते म्हणाले की, अंतिम टप्प्यात तीन अंतराळवीरांना घेऊन यान अवकाशात झेपावेल. हे यान पृथ्वीपासून ३०० ते ४०० किमी अंतराच्या कक्षेत सात दिवस प्रदक्षिणा घालेल. या काळात अंतराळवीर कमी गुरुत्वाकर्षणात वावरण्याचा, कामे करण्याचा सराव व प्रयोग करतील. प्रत्यक्ष अंतराळवीर पाठविण्याआधी दोनदा मानवरहित याने पाठवून सर्व यंत्रणांची कसोशीने चाचणी घेतली जाईल.सिवान यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी अवजड वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला ‘जीएसएलव्ही-मार्क ३’ हा सिद्धहस्त अग्निबाण वापरला जाईल.यानात जेथे अंतराळवीर बसतील तो कक्ष (क्रू मॉड्युल) सात मीटर उंचीचा व सात टन वजनाचाअसेल. सात दिवसांच्या सफरीनंतर यान अंतराळवीरांसह गुजरात किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात सुखरूपपणे उतरविले जाईल.‘इस्रो’खेरीज विविध विद्यापीठे, खासगी उद्योग तसेच सरकारी व खासगी संशोधन संस्थांचासक्रिय सहभाग असल्याने ‘गगनयान’ राष्ट्रीय अभिमानाची मोहीम असेल, असे सिंग म्हणाले. योजनेस विलंब होऊ नये व उणीव राहू नये यासाठी मित्रदेशांची मदत, सहकार्य घेण्याचाही ‘इस्रो’चा विचार आहे, असे सिवान म्हणाले.गगनयानच्या पूर्वतयारीचाच भाग म्हणून ‘इस्रो’ने गेल्या महिन्यात श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळतळावर ‘पॅड अ‍ॅबॉर्ट’ नावाची यशस्वी चाचणी केली. अपरिहार्य परिस्थितीत यान सोडून देण्याची वा नष्ट करण्याची वेळ आल्यास, अंतराळवीरांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासंबंधी ही चाचणी होती.अंतराळवीर कोण असतील?च्भारतीय वंशाच्या अंतराळवीरांनी याआधी अमेरिका व रशियाच्या यानातून अवकाशात भरारी घेतली असली तरी भारतीय यानातून जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होण्याचा मान कोणाला मिळेल, हे स्पष्ट व्हायला प्रतीक्षा करावी लागेल.च्कुशल व अनुभवी वैमानिकांना प्राधान्य दिले जाईल. त्यांची निवड करून अंतराळवीर म्हणून प्रशिक्षण देण्याचे काम ‘इस्रो’ व हवाई दल संयुक्तपणे करतील.

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत