गडकरी पुन्हा बनणार भाजपाध्यक्ष?

By Admin | Updated: May 13, 2014 12:13 IST2014-05-13T12:13:34+5:302014-05-13T12:13:46+5:30

भाजपा नेते नितीन गडकरी यांना प्राप्तिकर विभागाने क्लीन चीट दिल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असून ते पुन्हा एकदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Gadkari to become BJP president again? | गडकरी पुन्हा बनणार भाजपाध्यक्ष?

गडकरी पुन्हा बनणार भाजपाध्यक्ष?

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. १३ - भाजपा नेते नितीन गडकरी यांना प्राप्तिकर विभागाने क्लीन चीट दिल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असून ते पुन्हा एकदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनतील अशी शक्यता  वर्तवण्यात येत आहे. भाजपचे सरकार सत्तेत आल्यास गडकरींसाठी नवी संधी उपलब्ध होऊ शकते. पक्षाचे विद्यमान अध्यक्ष राजनाथ सिंग सरकारमध्ये सामील झाल्यास गडकरींच्या गळ्यात पुन्हा एकदा अध्यक्षपदाची माळ पडू शकते. 
सोमवारी संध्याकाळी गडकरींनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांनी संभावित निकाल व त्यानंतर निर्माण होणा-या परिस्थितीबद्दल चर्चा केली. तसेच १६ मे नंतर गडकरींच्या पक्षातील भूमिकेबद्दलही यावेळी चर्चा झाली.
गडकरी यांच्या पूर्ती ग्रुपची चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांची दस-यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी हुकली होती. गडकरींऐवजी राजनाथ सिंह यांना भाजपाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र आता गडकरींना  क्लीन चीट मिळाल्याने त्यांना पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्षपद मिळू शकते. 
 

Web Title: Gadkari to become BJP president again?