पैसे वाटपप्रकरणी घनदाट, गुट्टे यांना अटक व सुटका
By Admin | Updated: October 6, 2014 04:28 IST2014-10-06T04:28:59+5:302014-10-06T04:28:59+5:30
पैसे वाटपात अप्रत्यक्षरित्या सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट व राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना अटक केली.

पैसे वाटपप्रकरणी घनदाट, गुट्टे यांना अटक व सुटका
परभणी : मतदारांना पैसे वाटपात अप्रत्यक्षरित्या सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट व राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना रविवारी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
गंगाखेडमधील तांदुळवाडीत २ आॅक्टोबर रोजी मतदारांना पैसे वाटप करीत असताना निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु; आरोपी पळून गेले होते. हे पैसे वाटपात सीताराम घनदाट यांचा अप्रत्यक्षरित्या सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी रविवारी दुपारी घनदाट यांना अटक केली होती़ त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी घनदाट यांच्या घराची झडतीही घेतली.