जी-20 मध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना दिलंय खास ट्रेनिंग! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 15:40 IST2023-09-06T15:39:21+5:302023-09-06T15:40:02+5:30

या जवानांना नोएडा येथील व्हीआयपी प्रशिक्षण केंद्रात 50 प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले आहे.

g20 summit special training given to soldiers deployed in security of guests coming | जी-20 मध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना दिलंय खास ट्रेनिंग! 

जी-20 मध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना दिलंय खास ट्रेनिंग! 

नवी दिल्ली : दिल्लीत आयोजित G20 परिषदेमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक बारीकसारीक गोष्ट या जवानांना सांगितली आहे, जेणेकरून पाहुण्यांवर देशाची चांगली छाप पडेल. या जवानांची निवड करण्यासाठी आधारही ठरविण्यात आला होता. या जवानांना नोएडा येथील व्हीआयपी प्रशिक्षण केंद्रात 50 प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी 1000 जवानांची निवड करण्यात आली आहे, ज्यांना इंग्रजी बोलता येते आणि त्यांनी यापूर्वी व्हीआयपी ड्युटी केली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, सुरक्षेसाठी तुम्ही ज्या देशाच्या पाहुण्यांसाठी तैनात आहात, त्या देशाच्या रीतिरिवाजानुसार त्यांच्यासोबत वागा. पाहुण्यांच्या देशाची भाषा आणि इंग्रजी उच्चारणाचाही सराव करण्यात आला आहे, जेणेकरून गरज पडल्यास ते संवाद साधू शकतील. पाहुण्यांशी कसे वागावे आणि कसे वागू नये हेही शिकवले आहे, जेणेकरून पाहुण्यांवर चांगली छाप पडेल.

याचबरोबर, या जवानांना संबंधित पाहुण्यांच्या देशाच्या भाषेचे प्राथमिक ज्ञान देण्यात आले, जेणेकरून गरज पडल्यास ते सहज संवाद साधू शकतील. पाहुण्याने कोणती खबरदारी घ्यावी आणि गरज पडल्यास पाहुण्यांसाठी कोणते काम करता येईल, असेही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर व्हीआयपी गाड्या चालवणाऱ्या कमांडो चालकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात आले.

Web Title: g20 summit special training given to soldiers deployed in security of guests coming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.