रमेशचंद्र अग्रवाल यांच्यावर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: April 14, 2017 01:25 IST2017-04-14T01:25:00+5:302017-04-14T01:25:00+5:30

दैनिक भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल (७३) यांचा अंत्यविधी गुरुवारी येथील स्मशानभूमीत करण्यात आला. अग्रवाल यांचे अहमदाबादेत बुधवारी सकाळी

Funeral on Ramesh Chandra Agrawal | रमेशचंद्र अग्रवाल यांच्यावर अंत्यसंस्कार

रमेशचंद्र अग्रवाल यांच्यावर अंत्यसंस्कार

भोपाळ : दैनिक भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल (७३) यांचा अंत्यविधी गुरुवारी येथील स्मशानभूमीत करण्यात आला. अग्रवाल यांचे अहमदाबादेत बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अग्रवाल यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुधीर अग्रवाल यांनी पित्याच्या चितेला अग्नी दिला. या वेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, दिग्विजय सिंह, बाबूलाल गौर हे माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, मध्यप्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्र, गौरी शंकर शेजवार यांच्यासह इतर मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय आदी या वेळी उपस्थित होते. दुपारपर्यंत येथील बाजारपेठ बंद होती.

Web Title: Funeral on Ramesh Chandra Agrawal