शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार, राजकीय नेत्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 20:55 IST

भ्याड हल्ला करून  हत्या करण्यात आलेल्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी बंगळुरूमध्ये राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया, माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

बंगळुरू, दि. ६ - भ्याड हल्ला करून  हत्या करण्यात आलेल्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी बंगळुरूमध्ये राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया, माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. गंभीर वातावरणात उपस्थितांनी गौरी लंकेश अमर रहे अशा घोषणात देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलिसांनी त्यांना बंदुकांमधून गोळ्यांच्या फैरी झाडत त्यांना सलामी दिली.  गौरी लंकेश यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकीय नेत्यांसोबत कन्नड फिल्म जगतातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी गौरी यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला शोक अनावर झाला होता.  मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गौरी लंकेश यांची हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती.  ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मारेक-यांना पकडण्याचं मोठं आव्हान कर्नाटक पोलिसांसमोर आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पोलीस आयुक्त टी सुनील कुमार यांनी सर्व डीसीपींना शहरात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला आहे. सावधगिरी म्हणून सर्व महत्वाच्या रस्त्यांवर चेकपोस्ट उभ्या करण्यात आल्या आहेत. शहरात प्रवेश करणा-या सर्व टोलनाक्यांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून शहरात येणा-या आणि शहरातून जाणा-या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.  'मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिलेल्या आदेशानंतर तपासासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व चेकपोस्टवर लोक आणि वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. आंतरराज्यीय सीमांवरही आमचं लक्ष आहे', अशी माहिती पोलीस उपायुक्त एम एन अनुचेत यांनी दिली आहे. 'आम्ही शेजारी राज्य आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूलाही यासंबंधी अलर्ट दिला आहे', असं एम एन अनुचेत यांनी सांगितलं आहे.  पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला असल्याचीही माहिती मिळाली आहे. पोलिसांनी जवळपास 33 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असून एका सीसीटीव्हीत एक व्यक्ती कैद झाली असून त्याच्यावर पोलिसांना संशय आहे. या व्यक्तीने हेल्मेट घातलं होतं, तसंच अंगावर काळे कपडे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी परिसरातील मोबाईल टॉवरचीही तपासणी सुरु केली. तीन मोबाईल टॉवरची तपासणी सुरु असून त्यांचा डाटा गोळा केला जात आहे.   

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणIndiaभारतCrimeगुन्हाKarnatakकर्नाटक