शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 3:19 PM

देशाचे माजी वित्तमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी दिल्लीती निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नवी दिल्ली - देशाचे माजी वित्तमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी दिल्लीती निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण जेटलींचा मुलगा रोहन यांने त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंजत असलेल्या अरुण जेटली यांचे शनिवारी दुपारी निधन झाले होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी आज सकाळी अरुण जेटली यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानावरून भाजपाच्या मुख्यालयात आणण्यात आले होते. तेथे भाजपाच्या अनेक नेत्यांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.   अरुण जेटली ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी संगीता, विवाहित कन्या सोनाली जेटली-बक्षी व पुत्र रोहन असा परिवार आहे. जेटलींच्या निधनाचे वृत्त कळताच मोदी यांनी फोन करून जेटलींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. बरेच दिवस प्रकृती नाजूक असलेल्या जेटली यांना ९ आॅगस्ट रोजी श्वसनाचा त्रास होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने येथील एम्स रुग्णालयात दाखल केले गेले होते. तेव्हापासून जेटली अतिदक्षता विभागात होते व वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.गेले काही दिवस त्यांना जीवरक्षक यंत्रणांवर (लाइफ सपोर्ट) ठेवण्यात आले होते. हळूहळू एकेक अवयव निकामी होत त्यांची प्रकृती अधिकच ढासळत गेली व त्यातच दु. १२.०७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीNew Delhiनवी दिल्ली