Premium Vs Regular Petrol: देशभरात प्रीमियम पेट्रोलच्या दरात आजपासून (२० मार्च २०२६) वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विविध तेल कंपन्यांचे प्रीमियम पेट्रोल महाग झाले आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या'स्पीड' आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या 'पॉवर' आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या 'एक्सपी९५' या प्रिमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमध्ये ₹२.०९ ते ₹२.३५ रुपयांनी वाढ करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे रेग्युलर पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
अमेरिकाइस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष पेटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत आहे. याचा परिणाम भविष्यात इंधनाच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या तरी, प्रिमियम पेट्रोलच्या दरात वाढ वाढ करण्यात आली आहे. शिवाय, इंडस्ट्रियल डिझेलच्या दरात प्रति लिटर ₹२२.०२ ने वाढ झाली आहे.
प्रीमियम पेट्रोल आणि सामान्य पेट्रोलमधील फरक काय?
आजच्या धावपळीच्या युगात वाहनांची देखभाल आणि इंधनाची निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. आधुनिक आणि उच्च-कार्यक्षमतेची इंजिन असलेल्या वाहनांसाठी आता प्रीमियम पेट्रोल हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. सामान्य पेट्रोलच्या तुलनेत प्रीमियम पेट्रोलचे गुणधर्म अधिक सरस असल्याचे दिसून आले आहे. भारतात सामान्यतः प्रीमियम पेट्रोलचे रेटिंग ९१ ते ९३ च्या दरम्यान असते. तर, काही नामांकित ब्रँड्सचे रेटिंग यापेक्षाही जास्त असते. या उच्च ऑक्टेनमुळे इंजिनमधील नॉकिंग कमी होते. परिणामी, वाहन अधिक सुरळीत चालते आणि चालकाला उत्तम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. इंजिनच्या आरोग्यासाठीही हे इंधन उपयुक्त आहे. प्रीमियम पेट्रोलमध्ये काही विशेष ॲडिटिव्ह्ज मिसळलेली असतात. हे घटक इंजिनच्या आतील भागातील कार्बन साचू न देता ते स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. सांगायचे झाले की, प्रिमियम पेट्रोल वाहनाचे मायलेज सुधारण्यास मदत होते. तसेच इंजिनचे आयुष्य लक्षणीयरीत्या वाढवते.
Web Summary : Premium petrol prices increased nationwide due to international crude oil fluctuations and geopolitical tensions. Regular petrol remains stable, while premium variants see a ₹2.09-₹2.35 hike. Premium petrol offers better engine performance and mileage with special additives, justifying the higher cost.
Web Summary : अंतर्राष्ट्रीय बाजार में कच्चे तेल की कीमतों में उतार-चढ़ाव के कारण प्रीमियम पेट्रोल के दाम बढ़े। रेगुलर पेट्रोल स्थिर है, जबकि प्रीमियम पेट्रोल ₹2.09-₹2.35 महंगा हुआ। प्रीमियम पेट्रोल बेहतर इंजन प्रदर्शन और माइलेज देता है, जो उच्च लागत को सही ठहराता है।