शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 10:29 IST

Fuel Price: सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. गेल्या नऊ दिवसांत झालेल्या दरवाढीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे.

नवी दिल्ली - देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर इंधन कंपन्यांनी दररोज होत असलेला दरातील बदल थांबविला होता. त्यानंतर 82 दिवसांनंतर 7 जूनपासून कंपन्यांनी इंधनाचे दर दररोज जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. गेल्या नऊ दिवसांत झालेल्या दरवाढीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे डिझेलचे दर लिटरला 4.87 रुपये इतके वाढले आहेत. इंधन दरवाढीचा भडका उडणार असून आणखी काही दिवस पेट्रोल-डिझेल महागणार असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल-डिझेलच्या किमती या आणखी 2 आठवडे रोज वाढत राहतील. इंधनाच्या किरकोळ किंमतीमध्ये 8 रुपयांपर्यंतची वाढ करून लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई केली जावी अशी  तेल कंपन्यांची योजना राहील. तेल कंपन्यांनी 16 मार्च नंतर 83 दिवसांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतही वाढ केली नव्हती. लॉकडाऊनमध्ये राज्यांनी व्हॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स (VAT) मध्ये वाढ केल्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या होत्या. त्यावेळी तेल कंपन्यांनी कोणती वाढ केली नव्हती. 

सरकारने उत्पादन शुल्कामध्ये 3 रुपये प्रति लीटरची वाढ केली होती. तेल कंपन्यांनी 7 जूनपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली  दरम्यान अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, पुढील दोन आठवड्यांमध्ये होणाऱ्या वाढीबरोबरच 60 पैसे प्रति लीटर या दराने किंमती कमी देखील होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, मे मध्ये तेलाचा एकूण खप 1.465 कोटी टन राहिला आहे. जो एप्रिलपेक्षा 47.4 टक्क्यांनी जास्त आहे.

मार्चमध्ये सरकारेन पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्यूटी 3 रुपये प्रति लीटरने वाढवली होती. त्यानंतर सुद्धा तेल कंपन्यांनी किेमतीमध्ये टॅक्स वाढवला नव्हता. त्यामुळे आता त्यांच्याकडून रोज पेट्रोलच्या किमती वाढवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलची मागणी देखील वाढली आहे. तसेच घसरणारे रूपयाचे मूल्य तेल कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. लॉकडाऊनमध्ये तेल कंपन्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. त्यासाठी नुकसान भरपाई करण्यासाठी तेल कंपन्या प्रयत्नशील आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण

CoronaVirus News : दिलासादायक! 'या' टेस्ट किटने चाचणी केली जाणार; फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार

CoronaVirus News : जूनमध्ये 'या' दिवशी कोरोना व्हायरस होणार नष्ट?; शास्त्रज्ञाचा अजब दावा

CoronaVirus News : तुम्ही हसलात की 'तो' ही हसणार; कोरोनापासून वाचवणारा हटके LED मास्क पाहिलात का?

Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"

CoronaVirus News : कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत महत्त्वाची माहिती; आरोग्य मंत्रालयाचे नवे नियम

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे 'ते' फोटो पोस्ट करत असाल, तर....; सायबर सेलचा कडक इशारा

CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेलMumbaiमुंबईdelhiदिल्ली