शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल पुन्हा 18 पैशांनी महागलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 07:56 IST

दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल पुन्हा 18 पैशांनी महागलं आहे. 

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच चालले होते. त्यातून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मिळून पेट्रोलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कपात केली होती. परंतु राज्य सरकारनं डिझेलचे दर जैसे थेच ठेवले होते. त्यानंतर राज्य सरकारनंही डिझेलच्या दरातही 1.5 रुपयांची कपात केल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेली कपात मिळून डिझेल 4 रुपयांनी स्वस्त झालं होतं. मात्र आता दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल पुन्हा 18 पैशांनी महागलं आहे. 

मुंबईत शनिवारी (6 ऑक्टोबर) पेट्रोल 18 पैसे प्रति लिटरने महाग झाले आहे तर डिझेल 70 पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर  87.15 तर डिझेलचा प्रति लिटर दर 76.75 झाला आहे. 

(सौजन्यः डिझेल प्राइज डॉट कॉम)

राजधानी दिल्लीत पेट्रोल 18 पैसे तर डिझेल  29 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 81.68 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 73.24 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे. 

 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी 2.5 रुपयांनी इंधनाचे दर कमी करण्याची घोषणा केली. तसेच राज्य सरकारांनाही आणखी 2.5 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आवाहन केले. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने लगेचच 2.5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन  करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज होती. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला 80चा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत होती. विरोधी पक्षही या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत होते. या पार्श्वभूमीवर, सणासुदीचे दिवस आणि निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दरकपातीची भेट दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा इंधन दरवाढ होताना दिसत आहे.  

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलMumbaiमुंबईdelhiदिल्ली