एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना वकिलांचा पाठिंबा
By Admin | Updated: July 13, 2015 16:08 IST2015-07-13T16:08:38+5:302015-07-13T16:08:38+5:30
पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेल्या गजेंद्र चौहानच्या नियुक्तीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून योग्य तो तोडगा न निघाल्यास विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत यासंदर्भात न्यायालयात दाद मागायची असल्यास त्यांना कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन करण्यात येईल, असे अँड. असीम सरोदे यांनी सांगितले.

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना वकिलांचा पाठिंबा
प णे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेल्या गजेंद्र चौहानच्या नियुक्तीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून योग्य तो तोडगा न निघाल्यास विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत यासंदर्भात न्यायालयात दाद मागायची असल्यास त्यांना कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन करण्यात येईल, असे अँड. असीम सरोदे यांनी सांगितले. चौहान यांच्यासह नियामक मंडळाच्या इतर सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी महिन्यांपासून आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे, त्यांच्या या आंदोलनाला सामाजिक, कला, चित्रपट क्षेत्रासह अनेकांनी पाठिंबा दर्शविला आहे, त्यामध्ये आता कायदेतज्ञांचीही भर पडली आहे. यासंदर्भात सांगताना अँड. सरोदे म्हणाले, विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असलेले हे आंदोलन शिक्षणाचे महत्व टिकविण्यासाठी नव्हेतर शैक्षणिक प्रक्रियेतून होणा-या नेमणूक या कशा अपारदर्शक आणि अधोगामी विचारांचे स्वरूप पुढे आणत आहेत. विद्यार्थ्यांनी कुणाकडून शिक्षण घ्यायचे आणि शिकवणा-यांच्या दर्जाबाबत बोलायचे की नाही या प्रश्नांचा थेट संबंध निवड प्रक्रियांमध्ये विद्यार्थ्यांच्या निर्णयाला समावेश करून घेण्याशी आहे. जुन्या बुरसटलेल्या प्रक्रियांना नाकारण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना न्यायालयात जायचे असेल तर त्यांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रताप विटणकर, अलका बबलाद्री, राधिका देशपांडे, आस्था गुप्ता आदी वकिलांसह सामाजिक न्याय कार्यकर्ते संदीप बर्वे, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी तुषार वायळ, मुक्ता साठे तसेच जर्मनी येथील लॉ. स्टुडंट जुडीथ ओहन, एलीसा स्टर्न आदी उपस्थित होते. वकिलांच्या पाठिंब्याचे पत्र एफटीआयआय विद्यार्थी आंदोलनाचे समन्वयक अमेय गोरे यांना देण्यात आले. -------------------------------------------------------------------------------------------------------------------