एफटीआयआय ( बातमी जोड)
By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30
' संस्थेच्या संचालकपदी प्रशांत पाठराबे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे, त्यांना आमचा कोणताही विरोध नाही. मावळत्या संचालकांसारखा आम्ही त्यांच्याशी देखील संवाद साधू. आमची बाजू त्यांना समजावून सांगू. मात्र आमच्या मागण्यांची शासनस्तरावर जोपर्यंत कोणती दखल घेतली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहिल'- रंजित नायर, स्टुडंट असोसिएशन

एफटीआयआय ( बातमी जोड)
' ंस्थेच्या संचालकपदी प्रशांत पाठराबे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे, त्यांना आमचा कोणताही विरोध नाही. मावळत्या संचालकांसारखा आम्ही त्यांच्याशी देखील संवाद साधू. आमची बाजू त्यांना समजावून सांगू. मात्र आमच्या मागण्यांची शासनस्तरावर जोपर्यंत कोणती दखल घेतली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहिल'- रंजित नायर, स्टुडंट असोसिएशन -----------------------------------------------------------------------------चौकटडॉ. गणेशदेवी यांचाही विद्यार्थ्यांना पाठिंबाज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेशदेवी यांनी एफटीआयआयला भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. एनएससीआरटी किंवा ललित कला केंद्र अशा संस्थांमध्येही हेच प्रकार घडत आहेत. क्षमता नसलेल्या लोकांना संस्थांच्या संचालक किंवा अध्यक्षपदी विराजमान केले जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे. गुणवत्तेवर आधारित शिक्षणाचा विचार न करता त्याकडे धंदेवाईकतेच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. बिझनेस मेकँनिझम निर्माण करण्याच्या गोष्टी अशाच वाढत जाणार आहेत, मात्र त्याला विरोध झालाच पाहिजे असे सांगत डॉ. गणेशदेवी यांनी आंतरिक शक्तीला बळ बनवा आणि आंदोलनाची दिशा बदला, शैक्षणिक अभ्यास बंद करण्यापेक्षा वर्गात काळ्या फिती लावून बसा, असा अमूल्य सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.