रोजंदारी शिक्षकांचा आदिवासी विकासवर मोर्चा
By Admin | Updated: December 23, 2014 22:10 IST2014-12-23T22:00:10+5:302014-12-23T22:10:42+5:30
रात्री उशिरापर्यंत ठिय्या, तिघे रुग्णालयात

रोजंदारी शिक्षकांचा आदिवासी विकासवर मोर्चा
रात्री उशिरापर्यंत ठिय्या, तिघे रुग्णालयात
नाशिक : आदिवासी विकास विभागातील रोजंदारी स्वरूपातील सुमारे १८१५ शिक्षकेतर कर्मचारी व तासिकेवरील १४७७ शिक्षक यांना कायम करण्याच्या मागणीसाठी उत्तर महाराष्ट्रातील सहा एकातिमक आदिवासी विकास प्रकल्पातील सुमारे ५१० रोजंदारी शिक्षकतेर कर्मचारी व शिक्षकांचा मोर्चा काल सायंकाळी आदिवासी विकास विभागावर येऊन धडकला. रात्री उशिरापर्यंत या कर्मचार्यांनी आदिवासी कार्यालयासमोर ठिय्या आंदोेलन सुरू केले होते.
१८ डिसेंबरपासून तळोदा येथून सुमारे पाचशेहून अधिक आदिवासी विकास रोजंदारी शिक्षकेतर व शिक्षक कर्मचार्यांनी पायी मोर्चा सुरू केला. हा मोर्चा काल (दि,२३) सायंकाळी आदिवासी विकास विभागावर येऊन धडकला. राज्यभरात सुमारे ३२९२ अशी कंत्राटी स्वरूपातील कर्मचारी व शिक्षक असून, त्यांना कायम करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. १८ डिसेंबरपासून निघालेला हा मोर्चा काल दुपारी आडगावला येऊन सायंकाळी तो आदिवासी विकास विभागावर येऊन थडकला. सकाळपासूनच आदिवासी विकास विभागाभोवती कडक पोलीस बंदोबस्त होता. सायंकाळी आलेल्या मोर्चातील एक शिष्टमंडळ संघटनेचे अध्यक्ष केशव ठाकरे, उपाध्यक्ष विलास पाडवी, सचिव एस. पी. गावित, कोषाध्यक्ष बी. जी.
पाडवी, सदस्य बबिता पाडवी यांच्या शिष्टमंडळाने अपर आदिवासी आयुक्त लोखंडे यांच्याशी चर्चा केली. लोखंडे यांनी या मागण्या मंत्रालयीन पातळीवर पोहोचवतो, असे आश्वासन दिले. मात्र ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय आदिवासी विकास रोजंदारी शिक्षक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत आदिवासी विकास विभागासमोर हे ठिय्या आंदोलन सुरू होते. (प्रतिनिधी)
इन्फो..
तिघे रुग्णालयात
सलग पाच दिवसांपासून चालल्याने आदिवासी विकास रोजंदारी शिक्षक कर्मचारी संघटनेचे सचिव एस. पी. गावित, सदस्य बी. जी.पाडवी व अन्य एक अशा तिघांना छातीत दुखू लागल्याने व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती या मोर्चात सहभागी गणेश वसावे व आशिष वाडीले यांनी दिली. जिल्हा रुग्णालयात तिघांना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच आंदोलनकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन पदाधिकार्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
फोटो कॅप्शन
२३ पीएचडीसी-११३- आदिवासी विकास विभागासमोर ठिय्या आंदोलन करताना आदिवासी विकास रोजंदारी शिक्षकेतर व शिक्षक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी