शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 15:30 IST

बंगळुरूच्या डोड्डाबल्लापुरामध्ये राहणाऱ्या श्रीकांत बोलापल्ली यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. बंगळुरूच्या डोड्डाबल्लापुरामध्ये राहणाऱ्या श्रीकांत बोलापल्ली यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया... दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या श्रीकांत यांनी यशस्वीपणे शेती करून दाखवली आहे. आता ते ओम श्री साईं फ्लॉवर्सचे मालक आहेत. फुलशेतीशी संबंधित दरवर्षी त्यांचा 60-70 कोटींचा व्यवसाय आहे. 

सध्या 50 एकर जमीन आहे. 50 एकर जमिनीवर ते 10 एकर सिमला मिरची लागवडीसाठी ठेवतात. तर श्रीकांत उर्वरित 40 एकर जमिनीवर गुलाबासारख्या विविध प्रकारच्या फुलांची लागवड करतात. आपलं कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी त्यांनी तीन वर्ष आपलं शिक्षण सोडलं. त्यांच्या कुटुंबावर कर्ज होतं. मात्र लवकरच त्यांना आशेचा किरण दिसू लागला. 

1995 मध्ये त्यांना बंगळुरूला जाण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी त्यांच्या मूळ गावातील खासदाराने आयोजित केलेल्या फुलशेतीची माहिती घेतली. येथून त्यांचे आयुष्य बदललं. श्रीकांत यांनी शेतीच्या हायटेक पद्धती शिकल्या आणि यशाची नवीन दारे त्याच्यासमोर उघडली. यानंतर त्यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक आणि हायटेक शेतीचा अवलंब केला. 

श्रीकांत सांगतात, 'फार्ममध्ये पॉली हाऊस, ठिबक आणि स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टिम आणि सोलर पॅनल आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाने माझ्या शेतीच्या कार्याची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण याआधी त्यांनी एका ठिकाणी काम केलं होतं जिथे त्यांना दिवसाचे 18 तास काम केल्यावर फक्त 1000 रुपये मिळायचे. 

तुटपुंज्या उत्पन्नात श्रीकांत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नव्हते. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी फुलांच्या व्यवसायात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. श्रीकांत केवळ 18,000 रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीने या व्यवसायात उतरले. श्रीकांत यांना पहिल्या वर्षीच पाच लाखांचा नफा झाला. कालांतराने, त्यांच्या चिकाटीने आणि समर्पणामुळे त्यांना 50 कोटी रुपयांचे व्यवसायाचे लक्ष्य गाठता आले. 

2010 मध्ये व्यवसायातून मिळालेले उत्पन्न जमीन खरेदीत गुंतवले. त्यामुळे फुलांची लागवड करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. जिद्द आणि मेहनतीने त्यांनी आपली शेती 10 एकरांवरून 50 एकरपर्यंत वाढवली. श्रीकांत शेतीत आवड आणि समर्पण यावर भर देतात. त्यांच्या मते, तुम्ही जे काही कराल, ते करण्यात तुम्हाला रस असायला हवा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी