शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:12 IST

दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासणीत तपास यंत्रणांना अल-फलाह विद्यापीठातील डॉक्टरांच्या एका दहशतवादी मॉड्यूलबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे.

दिल्लीस्फोट प्रकरणाच्या तपासणीत तपास यंत्रणांना अल-फलाह विद्यापीठातील डॉक्टरांच्या एका दहशतवादी मॉड्यूलबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे. या मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या प्रत्येक दहशतवाद्याची भूमिका, काम आणि कथा वेगळी होती, पण त्यांचा उद्देश मात्र एकच होता. हे डॉक्टर मॉड्यूल कसे कार्यरत होते आणि कोणत्या सदस्यावर कोणती जबाबदारी होती, याचा सविस्तर प्लॅन उघड झाला आहे.

प्रत्येक भूमिकेचा सविस्तर उलगडाया मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या प्रमुख सदस्यांचे कार्य आणि त्यांच्या भूमिका..

मौलवी इरफान अहमद: कट्टरतावादी मास्टरमाईंडहा शोपियां येथील एका मशिदीत मौलवी होता. त्याचे मुख्य काम म्हणजे उच्चशिक्षित तरुणांना कट्टरपंथी बनवून त्यांना थेट जैश-ए-मोहम्मदमध्ये सामील करणे. तो पाकिस्तानी ऑपरेटर उमर बिन खत्ताब ऊर्फ हलजुल्लाह याच्या आणि जैशच्या अनेक कमांडरांच्या थेट संपर्कात होता. डॉक्टरांना या मॉड्यूलमध्ये आणणारा तोच मुख्य सूत्रधार होता. त्यानेच डॉ. मुजम्मिलला सर्वप्रथम जोडले.

डॉ. मुजम्मिल: मॉड्यूलचा आधारस्तंभ आणि स्फोटक वाहतूकदारमौलवी इरफानच्या सांगण्यावरून त्याने इतर डॉक्टर्सना या मॉड्यूलमध्ये जोडले. त्याचे काम रेडिकलायझेशनचे होते, ज्यात अल-फलाह विद्यापीठातील अनेक विद्यार्थी त्याच्या टार्गेटवर होते. स्फोटांसाठी लागणाऱ्या स्फोटकांचे वाहतूक करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती.

डॉ. शाहीन: निधी पुरवणारी प्रोफेसर आणि संघटकलखनऊची रहिवासी असलेली डॉ. शाहीन अल-फलाह विद्यापीठात प्रोफेसर होती. तिचे काम मॉड्यूलसाठी निधी जमा करणे आणि गरीब महिला-मुलींना जैश-ए-मोहम्मदच्या 'जमात-उल-मुमीनात' या संघटनेत सामील करणे हे होते. तिने मॉड्यूलला सुमारे २० लाख रुपयांचा निधी पुरवला होता. तिनेच तिचा भाऊ डॉ. परवेझ अन्सारी यालाही या कटाचा भाग बनवले.

डॉ. उमर नबी मोहम्मद: आत्मघाती बॉम्बर आणि केमिकल तज्ज्ञहा लाल किल्ल्यावर कार स्फोट घडवून आणणारा आत्मघाती बॉम्बर होता. मॉड्यूलमध्ये सर्वात जास्त रसायनशास्त्राची माहिती त्याच्याकडे होती. त्यानेच अमोनियम नायट्रेटपासून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. समोर आलेल्या त्याच्या व्हिडिओंमधून तो किती अतिरेकी विचारधारेने भरलेला होता, हे स्पष्ट होते.

डॉ. आदिल: हत्यार पुरवणारा आणि मॉड्यूलचा पर्दाफाशयाच्या अटकेनंतरच या संपूर्ण मॉड्यूलचा पर्दाफाश झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याला सहारनपूरमधून अटक केली होती. त्याच्या माहितीवरूनच डॉ. मुजम्मिल आणि डॉ. शाहीन यांना पकडण्यात आले. मॉड्यूलसाठी हत्यारे आणि शस्त्रे मिळवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. फरिदाबादमधून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि २९०० किलो स्फोटके याच तपासात जप्त झाली.

जसीर बिलाल वाणी ऊर्फ दानिश: बॉम्ब बांधण्यात प्रशिक्षित तज्ज्ञबॉम्ब बांधण्यात प्रशिक्षित असलेला हा मॉड्यूलची महत्त्वाची कडी आहे. त्याला डॉ. उमरने जोडले होते. तो सध्या ड्रोनमध्ये स्फोटके बांधून रिमोटने स्फोट घडवून आणण्याची तयारी करत होता. यानंतर त्याला मॉड्यूलसाठी रॉकेट तयार करायचे होते. एनआयएने त्याला नुकतीच काश्मीरमधून अटक केली आहे.

आमिर: लॉजिस्टिक पुरवणाराकाश्मीरचा रहिवासी असलेला आमिर डॉ. उमरच्या थेट संपर्कात होता. त्याचे काम मॉड्यूलसाठी लॉजिस्टिक पुरवणे हे होते. स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या i20 कारची व्यवस्था त्यानेच केली होती. ही कार विकत घेण्यासाठी त्याला डॉ. उमरने दहशतवादी निधीतून पैसे दिले होते.

या डॉक्टर मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या प्रत्येक सदस्याच्या अटकेनंतर, राष्ट्रीय तपास यंत्रणा या संपूर्ण कटाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Al-Falah's Doctors to Jaish's Blast Engineers: Delhi Plot Unveiled

Web Summary : Delhi blast probe reveals a doctor-led terror module. Members, including a radicalizing cleric, professors funding Jaish, bomb experts, and logistical support, have been arrested. The module planned attacks, procured weapons, and moved explosives. Investigation continues to uncover the full extent of the plot.
टॅग्स :delhiदिल्लीBombsस्फोटकेBlastस्फोट