मैत्रिदिन उत्साहात साजरा
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:10+5:302015-08-02T22:55:10+5:30
नवी मुंबई : सुी असूनही क्यांवर जमून, फ्रेंडशिप रिबन्स बांधून आणि एकमेकांना गिफ्ट्स देऊन कॉलेजियन्सनी मैत्रिदिन उत्साहात साजरा केला. वयाच्या मर्यादा पार करत आबालवृद्धही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना दिसले.

मैत्रिदिन उत्साहात साजरा
न ी मुंबई : सुी असूनही क्यांवर जमून, फ्रेंडशिप रिबन्स बांधून आणि एकमेकांना गिफ्ट्स देऊन कॉलेजियन्सनी मैत्रिदिन उत्साहात साजरा केला. वयाच्या मर्यादा पार करत आबालवृद्धही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना दिसले. रविवारमुळे महाविद्यालयाला सुटी असल्याने तरुणांनी मॉल्सचा रस्ता धरला. सकाळपासून पावसानेही विश्रांती घेतल्याने तरुणांची झुंबड उडाली होती. विविध रंगांचे फ्रेंडशिप बँड मित्रांना बांधून आणि एकमेकांच्या टीशर्ट्स आणा हातांवर नाव लिहून हा दिवस साजरा करण्यात आला. बाजारामध्ये यंदा वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेंडशिप बँड्स उपलब्ध असून त्यांच्या किमती ३ रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यंत आहेत.हा खास दिवस साजरा करण्यासाठी अनेक तरुणांनी वाशीतील मिनी सीशोअर, सागर विहार, बेलापूरमधील सरोवर विहार, कॉफी शॉप, मल्टीप्लेक्स अशा मैत्रीच्या क्यांची निवड केली. शहरातील सर्वच ठिकाणी तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला होते. तरुणांबरोबरच शहरातील विरंगुळा केंद्र, सामाजिक संस्था संघटनांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक जुन्या मित्रांनी गाठीभेटी घेऊन आठवणींना उजाळा दिला. जवळच्या मित्रासाठी आवडती भेटवस्तू खरेदी करण्यासाठी तरुणांनी गिफ्ट शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लोकलच्या महिला डब्यात, बसमध्येही फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. तरुणांबरोबरच वयोवृध्दामंध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पहायला मिळाला. यामध्ये महिला मंडळ,सार्वजनिक मित्र मंडळ यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)