शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत बोलण्याचं स्वातंत्र्य, पण रस्त्यावर बोलतो तसं इथे बोलणं अयोग्य; गृहमंत्री अमित शाह स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 11:15 IST

दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले, संसदेत बोलण्याचे काही नियम आहेत, त्यानुसारच बोलावे लागते. आपण रस्त्यावर बोलतो, तसे संसदेत बोलू शकत नाही. हे नियम आम्ही तयार केलेले नाहीत.

परदेशात जाऊन भारताची नकारात्मक प्रतिमा बनविण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. आपल्याला संसदेत बोलू दिले जात नाही, आपला आवाज दाबला जातो, असा आरोप राहुल गांधी करत आहेत. यातच, फ्रिडम ऑफ स्पीचला (freedom of speech) राजकीय शस्त्र बनविणाऱ्या राहुल गांधी यांना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले, संसदेत बोलण्याचे काही नियम आहेत, त्यानुसारच बोलावे लागते. आपण रस्त्यावर बोलतो, तसे संसदेत बोलू शकत नाही. हे नियम आम्ही तयार केलेले नाहीत.

'संसदेत नेहरू-इंदिरा यांच्या काळात तयार केलेल्या नियमांवर चालतो' -अमित शाह (Amit Shah) म्हणाले, संसद चलविण्यासाठी तयार करण्यात आलेले नियम काही दशकांपूर्वीच बनविण्यात आले आहेत. ते आम्ही तयार केलेले नाहीत. राहुल गांधींकडे इशारा करत शाह म्हणाले, हे नियम त्यांच्या आजीच्या वडिलांच्या काळापासूनच आहेत. तेही याच नियमांनुसार, चर्चा करत होते. आम्हीही याच निमयांचे पालन करतो. 

संसदेत बोलण्याचे स्वातंत्र -गृह मंत्री शाह म्हणाले, 'काँग्रेस नेत्यांनी संसदेत फ्रीडम ऑफ स्पीच असावा, असे स्लोगन आणले आहे. पण संसदेत फ्रीडम ऑफ स्पीच आहे (बोलण्याचे स्वातंत्र). आपल्याला बोलण्यावाचून कुणीही रोखू शकत नाही. पण संसदेत फ्री स्टाईलमध्ये बोलता येत नाही. संसदेत पूर्वीपासूनच ठरलेल्या नियमांनुसारच बोलावे लागते. नियम समजून घ्यावे लागतात. नियम वाचावे लागतात. यानंतर नियमांप्रमाणेच संसदेत चर्चा होते.'

'संसदेत संवाद आवश्यक' -याच वेळी, राहुल गांधींनी माफी मागायला हवी, असे भाजप नेते म्हणत आहेत. तर आदानींविरोधात जेपीसी बनवायला हवी,  असे विरोधाक म्हणत आहेत, अशा स्थितीत संसद कशी चालणार? असे विचारले असता शाह म्हणाले, 'लोकशी व्यवस्थेत एकटा सत्ताधारी पक्ष अथवा विरोधी पक्ष संसद चालवू शकत नाहीत. आपल्या प्रयत्नांनंतरही, तिकडून चर्चेचा प्रस्ताव येत नसेल तर कुणासोबत चर्चा करावी?'

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसद