चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर दाम्पत्याची मुक्तता
By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:24+5:302015-02-08T00:19:24+5:30
ठाणे - घराच्या भिंतीच्या वादातून शेजारील उपाध्याय दाम्पत्याला मारहाण करणार्या येऊरमधील रामविलास राम या दाम्पत्याला चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी मुक्त केले. प्रत्येकी पाच हजारांच्या बॉण्डवर या दाम्पत्याची सुटका करण्यात आली आहे.

चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर दाम्पत्याची मुक्तता
ठ णे - घराच्या भिंतीच्या वादातून शेजारील उपाध्याय दाम्पत्याला मारहाण करणार्या येऊरमधील रामविलास राम या दाम्पत्याला चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी मुक्त केले. प्रत्येकी पाच हजारांच्या बॉण्डवर या दाम्पत्याची सुटका करण्यात आली आहे.१७ मे २०१० रोजी राम दाम्पत्याने त्यांच्याशेजारी राहणार्या मुरारी उपाध्याय आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती. ते येऊर गावातील पाटीलपाड्यातील रहिवासी आहेत. राम दाम्पत्याने घराच्या पत्रे दुरुस्तीचे काम काढले होते. दोघांच्या घराची एकच भिंत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होता. यातूनच राम दाम्पत्याने उपाध्याय दाम्पत्याला शिवीगाळ आणि लोखंडी पीच्या साहाय्याने मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती एस. ए. आर. सय्यद यांनी राम दाम्पत्याची चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका केली. सरकारी वकील म्हणून एस. के. मोरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)