'फ्रीडम २५१' भाजपाचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेस खासदाराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 12:11 IST2016-02-26T12:06:19+5:302016-02-26T12:11:58+5:30
भाजपा खासदार प्रमोद तिवारी यांनी 'फ्रीडम २५१' हा भाजपाचा आतापर्यंत सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे

'फ्रीडम २५१' भाजपाचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेस खासदाराचा आरोप
>ऑनलाइन लोकमत-
नवी दिल्ली, दि. २६ - भाजपा खासदार प्रमोद तिवारी यांनी 'फ्रीडम २५१' हा भाजपाचा आतापर्यंत सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. राज्यसभेत बोलताना प्रमोद तिवारी यांनी हा आरोप केला आहे. प्रमोद तिवारी यांनी कंपनीकडून येणारा पैसा सुरक्षित ठेवला जावा अशी मागणी केली आहे. सरकारने सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून गाजावाजा केलेल्या फोनबद्दल सत्य पडताळून पाहावं. रिगिंग बेल्सला सरकारने मोठा पाठिंबा दिला आहे असंदेखील प्रमोद तिवारी बोलले आहेत.