शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

29 ऑक्टोबरपासून सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास, केजरीवालांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 5:04 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी रक्षाबंधनाच्या दिवशीच महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी रक्षाबंधनाच्या दिवशीच महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. नवी दिल्लीत 29 ऑक्टोबरपासून डीटीसी आणि क्लस्टर बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. महिलांना निःशुल्क प्रवास करता यावा, यासाठी केजरीवालांनी आज रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून ही घोषणा केली आहे. तसेच ही सेवा भाऊबीजेच्या दिवशीच कार्यान्वित होणार आहे. विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी या मोफत सेवेची घोषणा करून ती भाऊबीजेच्या दिवशी सुरू होणार असल्यानं भावाचं बहिणींना एक प्रकारचं गिफ्ट असल्याचीच चर्चा आहे.केजरीवालांनी ट्विट करत म्हटलं आहे की, रक्षाबंधनाच्या दिवशीच मी बहिणींना गिफ्ट देऊ इच्छितो. 29 ऑक्टोबरपासून दिल्ली परिवहन निगम(डीटीसी) आणि क्लस्टर बसमध्ये यांचा प्रवास निःशुल्क राहणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी महिलांना मेट्रो व बस प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. दिल्लीत महिलांना असुरक्षित वाटते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्ली सरकारने दिल्ली मेट्रो आणि डीटीसी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. तसेच महिलांच्या मोफत प्रवासामुळे डीएमआरसीचे होणारे नुकसान दिल्ली सरकार भरून काढेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. याचबरोबर येत्या दोन ते तीन महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय दिल्लीतील सक्षम महिला, त्यांना वाटल्यास तिकिट काढू शकतात. मात्र, त्यांना सबसिडीचा वापर न करण्यासाठी प्रेरित करण्यात येईल, असेही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. मेट्रोमध्ये दिल्ली सरकार व केंद्राचा 50-50 टक्के वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज आहे की, असे विचारले असता अरविंद केजरीवाल यांनी यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. दिल्ली सरकार सब्सिडी देत असून याचा खर्च सुद्धा दिल्ली सरकार देणार असल्याचं सांगितलं होतं. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल