शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

...तर रस्ते प्रवास होणार फुकटात, टोल न भरता निघा सुस्साट; अट फक्त एकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 12:07 IST

मोदी सरकारकडून नव्या योजनेवर काम सुरू; अंमलबजावणी झाल्यास विनाटोल प्रवास करता येणार

नवी दिल्‍ली: रस्ते आणि वाहूतक कोंडी हे समीकरण नवीन नाही. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अनेकदा चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच अनेकदा टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या रांगा टाळण्यासाठी आता मोदी सरकार नव्या धोरणावर काम करत आहे. या धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यास रस्ते वाहतूक वेगवान होईल.नवी योजना लागू झाल्यास राष्ट्रीय महामार्गांवर वाहतूक कोंडी झाल्यास टोल भरावा लागणार नाही. टोल नाक्यावरील प्रत्येक लेनमध्ये एक वेगळ्या रंगाची रेष असेल. वाहतूक कोंडी झाल्यास, वाहनांची रांग रेषेच्या पुढे गेल्यास टोल ऑपरेटरला त्या लेनचा गेट उघडावा लागेल. त्यानंतर त्या लेनमधील सर्व वाहनं टोलशिवाय जाऊ शकतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार सध्या या योजनेवर काम करत आहे.बाप रे...फास्टॅगच्या खात्यावर पैसै असतानाही भरावा लागतोय वाहनधारकांना दंडवाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फास्टॅग प्रणाली (fastag) आणण्यात आली. आता फास्टॅगचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र तरीही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे अहवाल वाहतूक मंत्रालयाला मिळाले आहेत. त्यामुळे मंत्रालयानं सर्व टोल नाके आणि तिथे लागणाऱ्या रांगांचं रियल टाईम मॉनिटरिंग सुरू केलं आहे.‘फास्टॅग’ असूनही खोळंबा, दुप्पट टोलवसुलीचाही भुर्दंड; रांगाच रांगा लागल्याने वाहनचालक हैराणगेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांची फौज टोल नाक्यावरील वाहतूक व्यवस्थापनाची देखरेख आणि विश्लेषण करत आहे. यामध्ये प्रादेशिक अधिकाऱ्यांपासून मुख्य व्यवस्थापकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 'फास्टॅगच्या माध्यमातून होणारे व्यवहार ६०-७० टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत गेले आहेत. ग्रामीण भागातही फास्टॅगचा वापर वाढला आहे. त्यामुळे आता आम्ही टोल नाक्यांवर होत असलेल्या कोंडीसाठी कोणतंही कारण देऊ शकत नाही,' अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.टोल नाक्यांपासून किती दूर रेष आखायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. टोल नाका ते रेष यांच्यातलं अंतर प्रत्येक ठिकाणी वेगळं असू शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. टोल नाक्यावरील वाहतूक आणि लेन्सची संख्या विचारात घेऊन रेष आखली जाईल, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं.

टॅग्स :tollplazaटोलनाकाFastagफास्टॅग