शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत २ महिन्यांपर्यंत मोफत रेशन, रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५ हजारांची मदत; केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 13:15 IST

Delhi CM Arvind Kejriwal : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५००० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील सुमारे ७२ लाख रेशनकार्डधारकांना दोन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाणार आहे.

 नवी दिल्ली : दिल्लीमध्ये (Delhi) कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांसाठी दिल्ली सरकारने मंगळवारी दोन मोठे निर्णय घेतले. त्याअंतर्गत दिल्लीतील सुमारे ७२ लाख रेशनकार्डधारकांना दोन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५००० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. (All autorickshaw drivers and taxi drivers in Delhi will be given Rs 5000 each by Delhi govt so that they get a little help during this financial crisis: Delhi CM Arvind Kejriwal)

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?- दिल्लीमध्ये लॉकडाऊन लागू करणे अत्यंत महत्वाचे होते, जेणेकरून कोरोनाची प्रकरणे कमी होऊ शकेल. परंतु लॉकडाऊनमुळे गरिबांवर आर्थिक संकट ओढावते. विशेषत: रोजंदारीवर मजुरी करतात आणि जे रोज पैसे कमवतात व खातात, त्यांना घर चालविणेही अवघड होते.- दिल्लीतील सुमारे ७२ लाख रेशनकार्डधारकांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाईल, परंतु याचा अर्थ असा नाही की कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन दोन महिने असेल. आर्थिक अडचणीत संघर्ष करणाऱ्या गरीब जनतेला मदत करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

- याचबरोबर ऑटो आणि टॅक्सी चालकांना ५-५ हजार रुपयांची मदत केली जाईल.- गेल्या लॉकडाऊनमध्ये दिल्ली सरकारने जवळपास १ लाख ५६ हजार चालकांची मदत केली होती.- सध्याचा कोरोनाचा काळ कठीण असून आपण सर्वजण यातून जात आहोत.- कोरोनची दुसरी लाट जास्त धोकादायक आहे.- सर्व लोकांना विनंती आहे की, सध्या एकमेकांची मदत करा. सर्व लोक कोणत्याही पार्टीचे असो, सर्वांनी मिळून मदत करावी. यावेळी कोणीही राजकारण करू नये.- आजारी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी, बेड न मिळाल्यास त्याची व्यवस्था करण्यास आणि ऑक्सिजन देण्यासाठी मदत करा.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNew Delhiनवी दिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्या