शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या योजनेचे आमिष दाखवून महिलेने घातला लाखोंचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 09:47 IST

मोदींच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने गावकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे.

लखनौ - मोदींच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने गावकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशमधील निगोहा येथील भद्दी शीर्ष गावात हा प्रकार घडला असून, फसवणूक झालेल्या गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फरार महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  निगोहा येथील पोलीस इन्स्पेक्टर चॅम्पियनलाल यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी या महिलेचे फोटो काढून ठेवले होते.त्याआधारावर या महिलेचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील एका गावात महिलेने मोदींच्या योजनेचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गावकऱ्यांचा लाखो रुपयांचां गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. भद्दी खेडा येथील मजरे शीर्ष गावात राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की, आठवडाभरापूर्वी एक महिला आपल्या दोन मुलांसह एका टबमध्ये काही भांडी घेऊन गाव आली. तिने आपला पत्ता मदाखेडा निगोडा असा सांगितला. आपल्या पतीचे सोन्या, चांदीच्या भांड्यांचे दुकान असून, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जुनी भांडी त्यावर 20 रुपये अधिक भरल्यावर नवी भांडी  आणि जुने दागिने दिल्यावर त्यावर दहा टक्के अधिक दागिने किंवा पैसे  देण्याची योजना  लागू करण्यात आली आहे, असे तिने सांगितले. तिच्या या भुलथापांना बळी पडून गावातील महिलांनी आपल्याकडील जुनी भांडी त्या महिलेला दिली. याचदरम्यान,  गावातील एका महिनेने आपल्याकडील चांदीची पैंजणसुद्धा बदलण्यासाठी दिली. त्यानंतर या महिलेने दुसऱ्या दिवशी संबंधित महिलांना जुन्या भांड्यांच्या बदल्यात नवी भांडी आणि जुनी पैंजण देणाऱ्या महिलेला नवी पैंजण दिली. हे पाहून गावातील इतर महिलांनी मोह आवरता आला नाही. त्यांनीही आपल्याकडील दागिने दिले. मात्र एक आठवडा उलटला तरी नवे दागिने देण्यासाठी ही महिला गावात आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले.  त्यानंतर गावकऱ्यांनी निगोहा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, फरार महिलेचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.   

टॅग्स :fraudधोकेबाजीCrimeगुन्हाUttar Pradeshउत्तर प्रदेश