फसवणूक

By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:57+5:302015-08-26T00:18:57+5:30

दुय्यम निबंधकांसह नऊ आरोपींवर गुन्हा दाखल

Fraud | फसवणूक

फसवणूक

य्यम निबंधकांसह नऊ आरोपींवर गुन्हा दाखल
फसवणूक : वकिलाचाही आरोपीत समावेश
नागपूर : रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक करणाऱ्या नऊ आरोपींविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आरोपींमध्ये दुय्यम निबंधकाचा आणि एका वकिलाचाही समावेश आहे.
अबूबकर सिद्दीकी हाफिज अब्दुल रशिद (वय ६५) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. ते रेल्वेचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतून कळमन्यात एक भूखंड विकत घेतला. आरोपी सुनील कानडे, राजू ढोले, गणेर, मारुती, सय्यद अनिस, मेहबूब पेंटर नियामत शेख आणि शोभा या सर्वांनी सिद्दीकी यांच्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार केली. ती खरी असल्याचे भासवून ॲड. सोना ओमप्रकाश गजभिये यांच्या मदतीने विक्रीपत्र तयार करून सह दुय्यम निबंधक ए. एस. उघडे यांच्याकडून त्याची नोंदणी करून घेतली. याबाबत ॲड. एम. आय. अन्सारी यांनी सिद्दीकी यांच्या फसवणुकीचे प्रकरण पोलीस ठाण्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र, त्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे ॲड. अन्सारी यांनी कोर्टातून आदेश मिळवून उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश मिळवले. त्यानुसार कळमना पोलिसांनी आरोपी कानडे, ढोले, गणेर, मारुती, सय्यद अनिस, मेहबूब पेंटर आणि शोभा यांच्यासह ॲड. गजभिये आणि सह दुय्यम निबंधक उघडे या सर्वांविरुद्ध १७ ऑगस्टला गुन्हे दाखल केले.
---

Web Title: Fraud