बलात्कार पीडित महिलेवर चौथ्यांदा अ‍ॅसिड हल्ला

By Admin | Updated: July 3, 2017 00:45 IST2017-07-03T00:45:38+5:302017-07-03T00:45:38+5:30

सामुहिक बलात्कारातील पीडितेवर (४५) गेल्या आठ वर्षांत येथे चौथ्यांदा अ‍ॅसिड हल्ला झाला. येथील अलिगंज भागात वास्तव्यास

Fourth time acid attack on rape victim woman | बलात्कार पीडित महिलेवर चौथ्यांदा अ‍ॅसिड हल्ला

बलात्कार पीडित महिलेवर चौथ्यांदा अ‍ॅसिड हल्ला

लखनौ : सामुहिक बलात्कारातील पीडितेवर (४५) गेल्या आठ वर्षांत येथे चौथ्यांदा अ‍ॅसिड हल्ला झाला. येथील अलिगंज भागात वास्तव्यास असलेल्या पीडितेवर वसतिगृहानजिक शनिवारी रात्री अ‍ॅसिड हल्ला झाला. तिचा चेहरा व गळ््यावर जखमा झाल्या असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे तिला संरक्षण दिले गेलेले असतानाही हा हल्ला झाला.
२०१२ मध्ये तिला भोसकण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. चार महिन्यांपूर्वी दोन जणांनी ही महिला येथून जवळ रेल्वेत असताना बळजबरीने तिच्या घशात अ‍ॅसिड ओतले. या घटनेनंतर पोलिसांनी तिला संरक्षण दिले होते. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी तिची रुग्णालयात भेट घेऊन मदत जाहीर केली होती.

Web Title: Fourth time acid attack on rape victim woman