थकीत कर्जात चौपट वाढ
By Admin | Updated: July 10, 2014 10:02 IST2014-07-10T01:02:04+5:302014-07-10T10:02:19+5:30
चौपट वाढ ही चिंतेची बाब असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत, असे संसदेत बुधवारी मांडलेल्या आर्थिक सव्रेक्षणात नमूद करण्यात आले.

थकीत कर्जात चौपट वाढ
नवी दिल्ली: देशातील बँकांच्या आणि खास करून सार्वजनिक क्षेत्रतील बँकांच्या थकीत कर्जामध्ये गेल्या दोन वर्षात झालेली चौपट वाढ ही चिंतेची बाब असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत, असे संसदेत बुधवारी मांडलेल्या आर्थिक सव्रेक्षणात नमूद करण्यात आले.
उद्या गरुवारी मांडल्या जाणा:या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येस वित्तमंत्री अरुण जेटली यांनी प्रथेप्रमाणो हा आर्थिक सव्रेक्षण अहवाल सादर केला. त्यात असे म्हटले आहे की, वर्ष 2क्12-13 मध्ये थकित कर्जाच्या प्रमाणात झपाटय़ाने वाढ झाल्याने बँकांच्या मालत्तांचा गुणात्मक दर्जा खालावला. थकित कर्जाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब
आहे.
सार्वजनिक बँकांनी थकित कज्रे ठरविणयाचे निकष बदलून त्याची मोजदाद ‘सिस्टिम-बेस्ड आयडेन्टिफिकेशन’ने करण्यास सुरुवात करणो, आर्थिकविकासाचा मंदावलेला वेग आणि भूतकाळात व खास करून आर्थिक तेजीच्या काळात आक्रमक पद्धतीने केलेले कजर्वाटप ही थकित कर्जामध्ये वाढ होण्याची प्रमुख कारणो असल्याचे सव्रेक्षणात नमूद केले गेले.
बँकांच्या मालमत्तांमध्ये दर्जात्मक घसरण झाली असली तरी सार्वजनिक क्षेत्रतील बँकांसह एकूणच भारतीय बँकाचा भांडवली पाया पुरेसा बळकट आहे व त्यांचे भाडवल किमान निर्धारित स्तराहून जास्त आहे, अशी आश्वासक नोंदही सव्रेक्षणात घेण्यात आली
आहे.
देशाच्या वित्तीय व्यवहारांमधील सहभाग समाजाच्या तळागळार्पयत पोहोचविणो हा सरकारच्या दृष्टीने अग्रक्रमाचा मुद्दा आहे, हे अधोरेखित करत सरकारने म्हटले की, देशातील बहुतांष कुटुंबे अजूनही वित्तीय व्यवस्थेतील सहभागापासून दूर असून त्यांना केवळ बँकांच्या माध्यमातून वित्तीयव्यवहारांमध्ये सामावून घेणो पुरेसे ठरणार नाही.
याच दृष्टीने सव्रेक्षण म्हणते की, वित्तीय क्षेत्रतील सुधारणांचा वेग त्या क्षेत्रतील नवोन्मेषी बदलांशी समानुपातीनाही. त्यामुळे भारतीय वित्तीय व्यवस्तेचे ख:या अर्थाने जागतिकीकरण करण्यासाठी यापुढील सुधारणा कायद्यांची चौकट अधिक बळकट करून, संघटनात्मक सुसंघटन करून, पारदर्शी धोरणो आखून व त्यांच्यात सातत्य राखून कराव्या लागतील.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4खासगी बँकांसह देशातील एकूण बँकिंग क्षेत्रतील थकीत कर्जाचे प्रमाण, एकूण कर्जाच्या तुलनेत, मार्च 2क्14 अखेरीस 2.36 टक्क्यांवरून 3.9क् टक्के एवढे वाढले. सव्रेक्षणानुसार पायाभूत सुविधा उद्योगास दिलेल्या कर्जामध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले.
4या क्षेत्रला दिलेली थकित कज्रे 3.23 टक्क्यांवरून वाढून 8.22 टक्क्यांवर पोहोचली. घेतलेली कज्रे वेळेत परत न करता येण्यासारखी वाईट स्थिती पायाभूत सेवा उद्योग, लोखंड व पोलाद, विमान वाहतूक आणि खाणकाम या क्षेत्रत ठळकपणो दिसून आली. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या भविष्यातील भांडवल पुरवठय़ासाठी सक्षम रोखे बाजार विकसित करावा लागेल.
बँक शाखांमध्ये वाढ
4बँकिंग सेवा अधिक सर्वदूर पोचविणासाठी सार्वजनिक क्षेत्रतील बँकांनी गेल्या वित्तीय वर्षात त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत सुमारे दुप्पट नव्या शाखा सुरु केल्या.
4वर्ष 2क्12-13 मध्ये 4,432 नव्या शाखा सुरु झाल्या होत्या. गेल्यावर्षी ही संख्या 7,84क् झाली.