शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

मुथरेत दरोडेखोरांच्या चकमकीत निष्पाप मुलाचा मृत्यू, चार पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 8:08 PM

मथुरेत दरोडेखोरांचा पाठलाग करताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका निष्पाप मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे.

उत्तर प्रदेश- मथुरेत दरोडेखोरांचा पाठलाग करताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका निष्पाप मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. लहानग्याचा मृत्यूनंतर चहूबाजूंनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका होऊ लागल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन पोलीस अधिकारी आणि दोन कॉन्स्टेबलना निलंबित केलं आहे.तसेच पीडित मुलाच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेश सरकारनं 5 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्याच्या आयजींकडे चौकशी सोपवली आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे दोन पोलीस उपनिरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आलं आहे. कॉन्स्टेबल सौरभ शर्मा आणि उधम सिंह यांनी मुलाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल न केल्याच्या कारणास्तव त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

सहावीच्या मुलीने पहिलीतल्या मुलाला भोसकलं शाळा लवकर सुटावी म्हणून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे हा गंभीर प्रकार घडला आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी  असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किंग जॉर्ज्स मेडिकल युनिव्हर्सिटीतील ट्रॉमा सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.मंगळवारी ब्राईटलँड इंटर स्कूल या शाळेत प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात जात होते. पहिल्या इयत्तेत शिकणारा हृतिक शर्मा हा देखील वर्गात जाण्याच्या तयारीत होता. परंतू वर्गात जात असताना मध्येच सातवीत शिकणारी एक मुलगी ह्रतिकजवळ गेली. तुझं नाव काय, तुला शिक्षकांनी बोलावले आहे, असे सांगत त्या मुलीने ह्रतिकला काही कळायच्या आत त्याच्या तोंडावर हात ठेवून खेचत त्याला शाळेतील स्वच्छता गृहात नेले.  मुलगा ओरडायला लागल्यावर तिने त्याच्या तोंडात कापडाचा बोळा घातला. ओढणीच्या सहाय्याने त्याचे हातपाय बांधले. दरवाजा बंद करुन तिने तीक्ष्ण हत्याराने ह्रतिकच्या पोटावर आणि छातीवर वार करायला सुरूवात केली. रक्तबंबाळ झालेल्या ह्रतिकला बाथरुममध्येच कोंडून ती पळून गेली. ह्रतिकचा आवाज ऐकून शाळेतील काही कर्मचा-यांनी स्वच्छता गृहाचा दरवाजा उघडला. रक्तबंबाळ अवस्थेत ह्रतिक पडला होता. त्याचे हातपाय बांधले होते, तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस